Goa Rain Updates: बुधवरपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी
Goa Rain UpdatesDainik Gomantak

Goa Rain Updates: बुधवरपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी

परतीच्या पावसाने राज्याला झोडपले

पणजी: परतीचा मॉन्सून (Monsoon) सुरू झालेल्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण राज्याला (Goa) मेघगर्जनेसह पावसाने (Rain Updates) झोडपले. सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. त्यामुळे घराबाहेर असलेले नागरिक आणि पर्यटकांची पुरती तारांबळ उडाली.

Goa Rain Updates
Goa: गांधी जयंतीदिनी खड्डयांवर झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

काल शनिवारपासून बुधावरपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचा हा परिणाम असून राज्यात सगळीकडेच मुसळधार पावसाने हजेरी लावली. आठच्या सुमारास साखळी परिसरात पहिल्यांदा पाऊस कोसळला. त्यानंतर संपूर्ण राज्याला विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने वेढले. सगळीकडे पाणीच पाणी झाले.

परतीच्या मान्सून काळात सहसा असा अचानक पाऊस होतोच, शक्यतो हा पाऊस सायंकाळी हजेरी लावतो. तसेच मेघगर्जना आणि वादळी वारेही स्वाभाविक आहेत. ही नियमित वातावरणीय प्रक्रिया असून शाहीन वादळाचा गोवा किनारपट्टीला धोका नाही.

- एम. राहुल, संचालक हवामान वेधशाळा

Goa Rain Updates
Goa Monsoon Update: परतीचा पाऊसही जोरदार बरसणार?

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. अर्थातच, घट झाली असतानाही राज्यातील स्थिती मात्र बिकट झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्‍यात गेली दोन वर्षे परतीच्या पावसानेही राज्यात हाहाकार माजविला होता, यंदाही परतीचा पाऊस जोरदार पडेल, असा अंदाज तज्‍ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पहिल्‍याच दिवशी 45 टक्‍क्‍यांची घट

राज्यात परतीचा पाऊसही तुफान बरसेल, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. परंतु, पोस्ट मान्सूनच्या पहिल्याच दिवशी नोंदीत चक्क 45 टक्क्यांची घट आहे. गेल्यावर्षी परतीचा पाऊस 9.1 इंच झाला होता. 2019 मध्ये 21.8, तर 2018 मध्ये 4.6 इंच झाला होता. परतीच्या पावसाची राज्यातील किमान सरासरी 7.9 इंच इतकी आहे.

Related Stories

No stories found.