पावसाच्या तडाख्याने भातपिकाची नासाडी

मागील आठवड्यातील पावसाच्या तडाख्यातून सावरलेला बळीराजा पावसामुळे पुन्हा हतबल
पावसाच्या तडाख्याने भातपिकाची नासाडी
नासाडी झालेले भातपिक दैनिक गोमन्तक

Goa: परतीच्या पावसाच्या (Rain) कहर चालूच असून, गेल्या आठवड्यात तडाखा (Rain hit) दिलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून दिले. आज मंगळवारी पुन्हा तडाखा दिल्याने डिचोलीतील (Bicholim) काही भागात भातशेती आडवी (Paddy cultivation is wasted) झाली असून, यंदा भात पिकाची नासधूस अटळ असल्याची भिती व्यक्त होत आहे.

नासाडी झालेले भातपिक
सांकवाळ पंचायतीच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

मागील आठवड्यातील पावसाच्या तडाख्यातून सावरलेला बळीराजा पावसाच्या अस्तित्वामुळे पुन्हा हतबल बनला आहे. आज सायंकाळी विजेच्या गडगडाटासह पावसाने डिचोलीतील बहूतेक भागात तडाखा दिला. पावसाच्या तडाख्यामुळे कापणीसाठी तयार झालेली मये आदी भागातील भात पिक पुन्हा आडवे झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा हताश बनला आहे. परतीच्या पावसाचा तडाखा असाच चालू राहिल्यास हातातोंडाशी आलेल्या भातपिकाची नाशाडी ठरलेली आहे. अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नासाडी झालेले भातपिक
गवाणे येथील एका मिनी पुलाचा कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीस व्यत्यय

भातशेतीची नाशाडी अटळ

डिचोलीतील मये आदी भागातील भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. नवे केल्याने मये आदी भागातील भात कापणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कापणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने कापणी अडली आहे. त्यातच आज सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परतीच्या पावसाचा कहर चालूच असल्याने बळीराजा अस्वस्थ बनला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com