गोव्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी, आंबा आणि काजू बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

  जानेवारीतील ऐन हिवाळ्यात गेले तीन दिवस गोव्यात पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. आज सकाळी गोव्यात सूर्यदर्शन झाले नाही.

पणजी :  जानेवारीतील ऐन हिवाळ्यात गेले तीन दिवस गोव्यात पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. आज सकाळी गोव्यात सूर्यदर्शन झाले नाही. मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पकडला होता. पावसाचा जोर पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कमी झाला असला, तरी पावसाची रिपरिप सकाळी आठ वाजेपर्यंत कायम असल्यामुळे हवेत गारवा पसरला होता. पावसामुळे सकाळी चालण्यास घराबाहेर पडणाऱ्यांना स्वेटरऐवजी रेनकोट घालावे लागले.

अवेळी पडणाऱ्या या पावसाचा मोठा फटका आंबा व काजू बागायतदारांना बसणार आहे. सध्या आंबे व काजूची झाडे मोहरली आहेत. पावसामुळे कोवळा फुलोरा गळून पडत आहे तर पक्व होणारा मोहोर एक प्रकारच्या बुरशीमुळे काळा पडणार आहे. यंदा पाऊस लांबल्याने मोहोर उशिरा आला होता त्यात जानेवारीत पावसाने जोर पकडल्याने आंबा व काजू पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे.

 

अधिक वाचा :

नॅशनल गेम निमित्त पणजीतील स्विमिंग पूलची पाहणी

मेळावली आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी पोलिस मुख्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांची धडक

मेळावली आंदोलनकर्त्यांच्या अटकेची आखली व्यूहरचना

संबंधित बातम्या