अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी रमेश तवडकर नियुक्त

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री रमेश तवडकर यांची आज (बुधवारी) नियुक्ती करण्यात आली. आदिवासी कल्याण खाते यापूर्वी तवडकर यांच्याकडे होते. 

पणजी: राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री रमेश तवडकर यांची आज (बुधवारी) नियुक्ती करण्यात आली. आदिवासी कल्याण खाते यापूर्वी तवडकर यांच्याकडे होते. 

संजीवनी साखर कारखाना सहकार खात्याकडून काढून कृषी खात्याकडे देण्याचा निर्णय घेतल्यापाठोपाठ सरकारने तवडकर यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करून सरकारने आदिवासी कल्याण खात्याचे कार्यही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी कल्याण खात्याच्या पदसिद्ध संयुक्त सचिव संध्या कामत यांनी तवडकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. 

तवडकर यांनी १९९५ मध्ये आदर्श युवक संघ स्थापन करून सामाजिक कामाची सुरवात केली आहे. १९९९ पासून ते भाजपमध्ये आहेत. बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण पोचवले. २००५, २००७ आणि २०१२ असे तीन वेळा ते आमदार होते. २०१२ मध्ये ते मंत्री झाले. मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या