देशात मद्यपान करणाऱ्यांमध्ये गोवा पाचव्या स्थानावर ; ईशान्येत मद्यपानाचं प्रमाण जास्त

PTI
सोमवार, 21 डिसेंबर 2020

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार मद्यपानामध्ये देशात गोवा राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. देशातील ईशान्य भागात मद्यपान प्रमाण अधिक असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 

पणजी : गोवा राज्य हे पर्यटनस्थळ असले, तरी मद्यपानासाठी मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात येतात, असा जो समज होता तो गेल्या आर्थिक वर्षात (२०१९ - २०) करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात चुकीचा ठरला आहे. या सर्वेक्षणानुसार मद्यपानामध्ये देशात गोवा राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. देशातील ईशान्य भागात मद्यपान प्रमाण अधिक असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 

या सर्वेक्षणात प्रत्येक राज्यातील मद्यपानाचा सर्वेची माहिती दिली आहे. गोव्यात १५ ते ४९ वयोगटातील महिलांचे मद्यपानाचे प्रमाण ०.१ टक्का आहे तर याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण ४४ टक्के आहे. १५ ते ५४ वयोगटातील पुरुषांचे मद्यपानाचे प्रमाण ३५ टक्के आहे. गोव्यापेक्षा चार राज्ये मद्यपानाच्या टक्क्येवारी पुढे आहेत त्यामध्ये आसाम (६९.२४), तेलंगणा (५२.८ टक्के), जम्मू काश्‍मीर (५१.४ टक्के), मेघालय (५४.६ टक्के) तर त्रुपिरा (५६.०८ टक्के) यांचा समावेश आहे. 
या सर्वेक्षणानुसार आसामध्ये मद्यपानात महिला आघाडीवर आहेत असे आढळून आले आहे. आसामात १५ ते ४९ वयोगटात हे प्रमाण२६.३ टक्के आहे. देशातील इतर राज्ये तसेच संघप्रदेशांच्या तुलनेत महिलांच्या बाबतीत हे प्रमाण अधिकच आहे. राष्ट्रीय स्तरावर महिलांचे मद्यपानाचे प्रमाण १.२ टक्के एवढे कमी असतानाही आसामात ते खूपच आहे. मेघालयात हे प्रमाण ८.७ टक्के आहे. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण ४.१ टक्के, बिहारात ६.९ टक्के, तेलंगणात ६.१ टक्के, जम्मू काश्‍मीरमध्ये २३ टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये ३.३ टक्के, मेघालयामध्ये ८.७ टक्के आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण या सर्वेनुसार अधिक दिसून आले आहे. 

गोवा हे राज्य मद्यपानासाठी जरी प्रसिद्ध असले तरी देशी व विदेशी पर्यटक अधिक त्याचा आस्वाद घेतात, मात्र स्थानिक पुरुष तसेच महिलांचे मद्यपानाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्याच्या तुलनेत बिहारमध्ये दारूबंदी असूनही तेथे मद्यपानाचे प्रमाण जास्त आहे. तेथे पुरुष मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात असे केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमणात मद्य विक्रीची मोठी उलाढाल होते. गोव्यातील पुरुषांचे मद्यपान प्रमाण ४४ टक्के असले तरी महिलांचे प्रमाण नगण्य (०.१ टक्के) आहे.

 

अधिक वाचा :

गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

गोव्यात 2022 मध्ये भाजप बहुमताने सत्तेत येणार ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना विश्वास

गोव्याच्या जनतेचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुकुमशाह होऊ नये 

संबंधित बातम्या