Goa: आसामच्या युवतीवर बलात्कारप्रकरणी एकाचा जामीन फेटाळला

नोकरी आमिष दाखवून आणले होते गोव्यात
Goa: आसामच्या युवतीवर बलात्कारप्रकरणी एकाचा जामीन फेटाळला
Goa Rape CaseDainik Gomantak

सासष्टी: नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात (Goa) आणलेल्या आसामी युवतीवर (Assam) बलात्कार केल्याप्रकरणी (Rape Case) केपे पोलिसांनी (Quepem Police) अटक केलेल्या संशयित सुधाकर नाईक याने सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने (Goa Court) फेटाळून लावला.

मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशा दुर्गा मडकईकर यांच्या न्यायालयाने सदर निवाडा दिला. सुधाकर याच्या बाजूने ॲड अमेय प्रभुदेसाई बाजू मांडत आहेत तर शासनातर्फे सरकारी वकील गावकर यांनी बाजू मांडली. या बलात्कार प्रकरणात संशयित सुधाकर नाईक आणि शंभुनाथ सिंग यांना अटक करण्यात आली होती. दोघांनीही जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. संशयित शंभुनाथ सिंग याच्या जामिनावर सुनावणी सुरू असून शंभूनाथ यांच्या बाजूने ॲड. मडकईकर बाजू मांडत आहे. संशयित शंभूनाथ याने २६ जुलै रोजी पीडित मुलीला केपे येथे आणले होते. त्याच्या बहिणीची सदनिका केपेतील ‘इडन गार्डन’ इमारतीत आहे. तिथेच त्याने तरुणीची राहण्याची व्यवस्था केली होती.

Goa Rape Case
Goa : मुख्‍य संशयित मिनेश नार्वेकर पोलिसांना शरण (minesh narvekar)

तरुणीच्या तक्रारीनुसार, त्या सदनिकेत प्रथम शंभूनाथ याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर 28 जुलै रोजी कुडचडे येथे दुकान चालवणाऱ्या सुधाकर याने बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या तरुणीने घडलेला प्रकार स्वतः व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नंतर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. पोलिसांनी बुधवारी रात्रीच गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना अटक केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com