Goa Rape Case: बाणावली बलात्कार प्रकरणाला राजकीय रुप देऊ नका, आरोपींना कडक शिक्षा हाच अंतिम निवाडा

मुख्यमंत्र्यांचे विधान योग्य, पण त्यांनी निषेध केल्याचे दिसले नाही (Goa Rape Case)
Aavda Vehigas of 'Baaylancho Ekvot Organization' speaking at the press conference (Goa Rape Case)
Aavda Vehigas of 'Baaylancho Ekvot Organization' speaking at the press conference (Goa Rape Case)Manguesh Borkar / Dainik Gomantak

फातोर्डा: बाणावली (Benaulim) येथील दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरण (Goa Rape Case) हे गंभीर स्वरुपाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय किंवा सनसनाटी रुप देऊ नका (Political issue), असे आवाहन 'बायलांचो एकवट'च्या (Baaylancho Ekvot), आवडा व्हिएगस यांनी केले. आज मडगावात आपल्या निवास्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की पोलिसांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले असुन आरोप्यांना दोषी ठरवून त्यांना कडक शिक्षा हाच आपल्यासाठी अंतिम निवाडा अपेक्षीत असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr Pramod Sawant) यांनी पालकांसबंधी जे विधानसभेत वक्तव्य केले ते एक पालकाच्या नजरेतुन योग्यच आहे. मात्र त्यांनी बलात्काराचा कुठेही निषेध केल्याचे जाणवले नाही, हेच गोष्ट खटकली असल्याचेही व्हिएगस म्हणाल्या. तसेच त्यानी गोव्याचे डीजीपी, दक्षिण गोव्याचे पोलिस अधिक्षक पंकज कुमार सिंग तसेच कोलवा पोलिस स्थानकातील पोलिसांचे प्रशंसा देखल केली.

Aavda Vehigas of 'Baaylancho Ekvot Organization' speaking at the press conference (Goa Rape Case)
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

आपल्या मुलांचे संरक्षण करणे हे प्रत्येक पालकांचे व त्याच बरोबर समाजाचे कर्तव्य आहे. मुले व पालकांमध्ये अशा प्रकारच्या प्रकरणी कसे वागावे किंवा असे प्रसंग कसे टाळावेत या संबंधी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक पंचायत व नगरपालिका क्षेत्रात मुलांच्या संरक्षणार्थ समित्या असतात. गोव्यात अशा समित्या कार्यरत आहेत का? असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला. बायलांचो एकवटतर्फे व्हिएगशने सरकारला 10 कलमी मागण्या सादर केल्या आहेत. सर्वप्रथम जो सरकारी कर्मचारी या प्रकरणात गुंतलेला आहे त्याला नोकरीतुन केवळ निलंबीत न करता सेवेतुन काढुन टाकावा. मानवी तस्करी खास करुन मुलांच्या बाबतीत प्रकरणांचा लवकरात लवकर शोध लावावा.

Aavda Vehigas of 'Baaylancho Ekvot Organization' speaking at the press conference (Goa Rape Case)
Goa Police: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

समुद्र किनाऱ्यावर पोलिसांची गस्त वाढवावी. सर्वत्र रोषणाई करावी. समुद्र किनाऱ्यावर दारु पिणाऱ्यांना व भटकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. पोलिसांना जास्तीतजास्त वाहने पुरवावीत. जिल्हा पोलिस स्थानकात वरीष्ठ महिला पोलिस निरिक्षकांची नियुक्ती करावी. महिला व मुलांच्या संरक्षणार्थ प्रत्येक पोलिस स्थानकांत साधन सुविधा वाढवाव्यात व पिडितांची ओळख जाहीर करणाऱ्यावर स्वाधिकारे दखल घ्यावी. बलत्कार प्रकरणी पिडितांची तपासणी करणाऱ्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करावे. असेही व्हिएगस शेवटी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com