‘त्या’ बलात्कारी शिक्षकाची अटकेपुर्वी जामिनासाठी न्यायालयात धाव

सलग अत्याचार करून तिच्यावर दोन वेळा मातृत्व लादले, तर दोन्ही वेळा तिचा गर्भपात करण्यात आला
‘त्या’ बलात्कारी शिक्षकाची अटकेपुर्वी जामिनासाठी न्यायालयात धाव
Goa rapist teacher went court for bail before being arrestedDainik Gomantak

सासष्टी: कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2010 पासून बलात्कार करत असल्याचा आरोप असलेला संशयित मायकल क्रास्टो या शिकवणी शिक्षकाने अटक होण्याच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

Goa rapist teacher went court for bail before being arrested
गोव्यात संतापाची लाट: शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

29 सप्टेंबर रोजी पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. संशयित सदर पीडितेवर अल्पवयीन अवस्थेत असल्यापासून ते आतापर्यंत अत्याचार करून तिचा छळ करत होता. 2010 साली संशयित पीडित युवतीची शिकवणी घेण्यासाठी येत होता. यावेळी संशयिताने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला आणि याबाबत कुणाला सांगितल्यास तिचे नाव बदनाम तसेच तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. सलग अत्याचार करून तिच्यावर दोन वेळा मातृत्व लादले, तर दोन्ही वेळा तिचा गर्भपात करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे.

Goa rapist teacher went court for bail before being arrested
शिक्षकच बनला भक्षक; 9 वर्षांच्या मुलीवर VIDEO दाखवून केला लैंगिक अत्याचार

दरम्यान बार्देश तालुक्यातील म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका 47 वर्षीय ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने 7 वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या शिक्षकाविरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. दरम्‍यान, या प्रकारामुळे म्‍हापशात संतापाची लाट पसरली होती. संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्‍याची मागणी करण्यात आली होती

Related Stories

No stories found.