Goa: राष्ट्रिय बजरंग दलाची फेर स्थापना

राष्ट्रिय बजरंग दलाच्या गोवा (Goa) शाखेची राज्य कार्यकारीणीही जाहिर करण्यात आली.
राष्ट्रिय बजरंग दल
राष्ट्रिय बजरंग दलDainik Gomantak

पणजी: गोव्यात (Goa) राष्ट्रिय बजरंग दलाची फेरस्थापना करण्यात आली. नितीन फळदेसाई यांची गोवा बजरंग दलाच्या अध्यक्षपदी (president)नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यात पुर्वी विश्‍व हिदू परिषदे सोबतच बजरंग दलाची शखाही कार्यन्वीत होती. मात्र गेली काही वर्षे तिचे काम थंडावले होते. आजपासून ते पुन्हा सुरु झाले आहे.

प्रविण तोगाडीया (Pravin Togadia)यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रिय बजरंग दलाचे कोकण प्रांताचे अध्यक्ष गिरीश पाटील यांच्या उपस्थितीत आज पणजी येथील सिध्दार्थ भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press conference) राष्ट्रिय बजरंग दलाची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

राष्ट्रिय बजरंग दल
पणजी महानगरपालिकेचा ढोंगळ कारभार;पाहा व्हिडिओ

यावेळी राष्ट्रिय बजरंग दल गोवाचे नूतन अध्यक्ष नितीन फळदेसाई व नूतन महामंत्री विनायक च्यारी व्यासपिठावर उपस्थित होते. हिंदू धर्म रक्षण, हिंदू संस्कृती रक्षण व गोव्याच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बजरंग दल कटीबध्द असल्याचे यावेळी गिरीश पाटील यांनी सांगितले.

अजय सावंत, धिरज सावंत व मारुती करमली यांची राष्ट्रिय बजरंग दलाच्या गोवा शाखेच्या उपाध्यक्षपदी तर हर्षद देवारी व मंदार गणपुले यांची सहमंत्री म्हणून नियुक्ती यावेळी जाहिर करण्यात आली. राष्ट्रिय बजरंग दलाच्या गोवा शाखेची राज्य कार्यकारीणीही यावेळी जाहिर करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com