कोरोना रोखण्‍यासाठी गोवा सज्ज; असा आहे मास्टर प्लान 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

पणजी : राज्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रसारामुळे सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे. येत्या 1 मे पासून 18  वर्षे व त्यावरील व्यक्तीला मोफत कोरोना लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख कोविशिल्ड लसीचा सिरम इन्स्टिट्यूटकडून पुरवठा खरेदी करण्यात येईल.

पणजी : राज्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रसारामुळे सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे. येत्या 1 मे पासून 18  वर्षे व त्यावरील व्यक्तीला मोफत कोरोना लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख कोविशिल्ड लसीचा सिरम इन्स्टिट्यूटकडून पुरवठा खरेदी करण्यात येईल. त्यासाठी सरकारने सर्व तयारी सुरू केली आहे. सरकारी तसेच खासगी इस्पितळातील कोरोना संसर्ग रुग्णांसाठी प्राणवायूचा (ऑक्सिजन) मुबलक साठा आहे. कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यात उशीर होत असल्याने खासगी थायरोकेअर लॅब ची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व आरोग्य संचालक डॉ. जोझ डिसा होते. (Goa ready to stop Corona; This is the master plan) 

Goa Muncipal Election 2021: गोव्यात लसीकरण नाही निवडणूक महत्त्वाची?...

सरकारी कार्यालयात प्रतिदिन फक्त 50  टक्के कर्मचारी 
वाढत्या कोविड संसर्गाच्या संख्येमुळे सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती 50  टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खातेप्रमुखांनी दरदिवशी50  टक्के कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करून त्यांना कामावर बोलवावे तर इतरांनी घरातून काम करावे. पोलिस, गृहरक्षक, नागरी सेवा, तुरुंग, अग्निशमन दल, कोषागार, जिल्हा प्रशासन, वन खाते, पालिका ही खाती कोणत्याही निर्बंधाशिवाय काम करतील, असे आदेशात नमूद केले आहे.  

Goa Municipal Elections 2021: कोरोना पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का घटणार?

चाचणी अहवाल  ३६ तासांत मिळणार
24 तासांत 21 जणांचा मृत्‍यू राज्यात आज दिवसभरात 3906 कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात 1410 जण कोरोना संसर्गित सापडले आहेत. कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण आज पुन्हा वाढले असून 21  मृत्यूची नोंद झाली आहे. मागील चार दिवसांत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूचे प्रमाण हजाराच्या आसपास पोहोचले आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा (461) दुप्पटीने आहे. 134  कोरोना रुग्णांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले असून 651  जणांनी गृह अलगीकरणात राहण्याचे कळविले आहे. राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 10,228 झाली आहे. त्यातील 9107 कोरोना रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस ( 84.50 टक्के) कमी होत आहे. सध्या सरकारी व खासगी इस्पितळात 956 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे त्यातील 90 टक्के हे गोमेकॉ व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आहेत, असे धवन म्हणाले. 

15 लाख डोस खरेदी करणार 
कोविड - 19  च्या लसीकरणासाठीच्या साठ्याची ऑर्डर गोवा सरकार थेट उत्पादन कंपनीकडे करणार आहे. पहिल्या टप्प्यात 5  लाख डोस मागवण्यात येतील. सुमारे 15 लाख कोविड लसीचे डोस सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून घेण्यात येणार आहे. ही लस 18  ते 45 या वयोगटातील सर्वांना मोफत दिली जाईल. गोमंतकीयांच्या चांगल्या आरोग्यसाठी व कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट केले आहे. 

केंद्राकडून मिळणार ऑक्सिजन 
राज्यात कोविड विषाणूविरोधात लढा देण्यासाठी तसेच लोकांचे जीव वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालय व जेएसडब्ल्यू  यांनी हस्तक्षेप करून द्रव्य प्राणवायूचा (ऑक्सिजन) गोव्यासाठी पुरवठा करण्यास मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. केंद्राकडे गोव्यासाठी तीन ऑक्सिजनयुक्त टाक्या देण्याची मागणी केली होती ती मान्य केली, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. 
 

संबंधित बातम्या