गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना लसीमुळे मोठी मदत होताना दिसते आहे.

पणजी: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना लसीमुळे मोठी मदत होताना दिसते आहे. राज्यात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत जात असल्याने कोरोना लसीची मोठी आवश्यकता असल्याचे समजते आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी राज्याला कोरोना लसीचे डोस मिळाल्याची माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी राज्याला कोविशिल्ड लसीचे (Corona Vaccine) अतिरिक्त 1,50,000 डोस मिळाले असल्याचे समजते आहे. तर आतापर्यन्त राज्यात आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना  2.39 लाखाहून अधिक डोस देण्यात आलेले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे. तसेच पुढे त्यांनी 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4.5 लाख लोकांना लसी देण्याचे लक्ष्य आपल्यासमोर असल्याचे देखील सांगितले. तर राज्यात टीका उत्सवाच्या नवव्या दिवशी इतर 8,107 जणांना लसीकरण करण्यात आले, 3,832 पंचायत आणि इतर खासगी व सार्वजनिक रुग्णालयात लसीकरण करण्यात आले असल्याचे समजते आहे.

गोवा: कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

संबंधित बातम्या