गोव्यात गेल्या 24 तासात 50 रूग्ण ‘कोरोना’मुक्त; 61 नव्या रूग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

गोव्याला कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला. गेल्या 24 तासात एकाही कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले नाही.

पणजी : गोव्याला कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला. गेल्या 24 तासात एकाही कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारीला रोजी 61 व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या आढळल्या. तर आज 50 व्यक्ती कोरोना संसर्गमुक्त झाल्या. कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 498 झाली असून, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती बरे होण्याची टक्केवारी 97.47 वर पोहोचली आहे.

गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधक एकवटले

दरम्यान, 26 फेब्रुवारीला गोव्यात 25 फेब्रुवारीपेक्षा दुप्पट म्हणजेच, 100 कोरोना रूग्ण आढळले होते. त्यामुळे, काल दिवसभरात सापडलेली कोरोना रूग्णसंख्या ही दिलासादायक आहे. महारष्ट्र-कर्नाटकात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम गोव्यातील रूग्णसंख्येवर होण्याची भिती वर्तवली जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात फिरायला येतात. या पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास, त्याचा फटका गोव्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

‘आयआयटी’ जागा निश्‍चितीसाठी गोवा सरकारची आता सावध भूमिका

संबंधित बातम्या