COVID-19 Goa: चिंता कायम! गोव्यात चोवीस तासांत 2491 कोरोना रुग्णांची नोंद

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

सकारात्मक बाब अशी आहे की, मागच्या 24 तासांत 2266 रुग्ण बरे होऊन घरी परतेल आहेत.

कोरोना (Covid-19) संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून काहीकाळ सुरक्षित राहिलेल्या गोव्यात (Goa) सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या (Covid 19 patients) वाढत जात असल्याचे पाहायला मिळते आहे. याच अनुशंघाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. तरी सुद्धा गोव्यात हजारो कोरोना रुग्ण सापडत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आजसुद्धा गोव्यात 2491 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (Goa records 2000 new covid patient in last 24 hours.)

गोव्यात फोफावत चाललेल्या कोरोना संक्रमणावर आळा घालण्यासाठी गोव्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरी देखील रुग्णवाढ थांबताना दिसत नाहीये. आज गोव्यात 2491 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या नव्या रुग्णांसह राज्यात सध्या 32953 रुग्ण उपचार घेत आहेत. तर दुःखद गोष्ट ही आहे की गोव्यात 24 तासांत 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यूचा आकडा 1937 वर पोहोचला आहे. 

Goa Oxygen Crisis: सोमवारपर्यंत ऑक्सिजनचा प्रश्न सोडवा; गोवा खंडपीठाचे सरकारला...

कोरोनाचे हे संकट वाढत जात असताना सकारात्मक बाब अशी आहे की, मागच्या 24 तासांत 2266 रुग्ण बरे होऊन घरी परतेल आहेत. यासह आता पर्यंत गोव्यातील 95240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तरी येणाऱ्या काळात रुग्णवाढ होऊ नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. 

संबंधित बातम्या