गोव्यात गेल्या 24 तासांत 54 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; लसीकरण मोहिम वेगवान

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

 राज्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची तथा उपचार घेणाऱ्यांची संख्या अनेक दिवसानंतर सहाशेच्यावर पोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे

पणजी : राज्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची तथा उपचार घेणाऱ्यांची संख्या अनेक दिवसानंतर सहाशेच्यावर पोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज तारीख 28 फेब्रुवारी रोजी नवीन 54 कोरोना संसर्गित व्यक्ती सापडल्या तर कोरोनावर उपचार घेणारे 45 रुग्ण बरे झाले. आज दिवसभरात 1224 व्यक्तींच्या सॅम्पल ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 54 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी 33 व्यक्ती स्वतःच्या घरातच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात कोरोना संसर्ग झालेल्या एका व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात कोरोना संसर्ग होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या 795 झालेली आहे. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 606 झाली आहे.

गोवा सरकारला दणका; नगरपालिका आरक्षण प्रक्रिया नव्याने करण्याचा आदेश

राज्यातील सुमारे 37 केंद्रांवर सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होईल. लसीकरणास येताना आधारकार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र घेऊन यावे. लसीकरणासाठी येणाऱ्यांची सुरवातीला नोंदणी केली जाईल. 45 ते 49 या वयोगटातील लोकांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार त्यांना असलेल्या इतर आजारासंबंधी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणावे. या प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. दोन्ही गटांसाठी शासकीय पोर्टल खुले झाल्यानंतर कोविड पोर्टलवरही सर्वांची ऑनलाइन नोंदणी करता येईल. गोवा मेडिकल कॉलेज, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, म्हापसा आणि फोंडा उपजिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्रे आदी सर्व 37 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाईल.

निवडणूक प्रक्रिया 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे गोवा खंडपीठाचे निर्देश

प्रत्येक केंद्राला दुसऱ्या प्रतिबंधक लस मोहिमेंतर्गत दररोज 100 लसीकरणाचे लक्ष्य दिले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या लसीचे शुल्क 250 रुपये ठरवून दिले आहे. सरकारी रुग्णालयात दिली जाणारी लस विनामूल्य आहे. ओळखपत्राची सक्ती लसीकरणास येताना आधार कार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र घेऊन यावे. 45 ते 49 या वयोगटातील लोकांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार त्यांना असलेल्या आजारासंबंधी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणावे. या प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या