गोव्यात गेल्या 24 तासात 58 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गोव्यात गेल्या 24 तासात, कोरोनाचे 58 नवे रूग्ण आढळून आले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्या रूग्णांची संख्या 53,996 इतकी झाली आहे.

पणजी : गोव्यात गेल्या 24 तासात, कोरोनाचे 58 नवे रूग्ण आढळून आले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या 53,996 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 774 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून, गेल्या २४ तासात कोरोनामुळे २ रूग्ण दगावले आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 692 इतकी झाली आहे.

Corona Update : दोडामार्गात कोरोना लसीकरणास प्रारंभ

दरम्यान, गोव्यात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मिळून 19,329 जणांची नोंद झालेली असून आतापर्यंत 7,246 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत उर्वरित सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पूर्ण केला जाणार आहे. त्याचबरोबर 8 फेब्रुवारीपासून पोलिस, सुरक्षा रक्षक व इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास सुरवात झाली आहे. त्यासाठी आतापर्यंत 15,647 जणांची नोंदणी झालेली आहे. 16 जानेवारीपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम सुरू झालेली आहे.

गोव्यातील बैलांच्या झुंजी आयोजकांवर पोलिसांच्या खास पथकाचे लक्ष

संबंधित बातम्या