Goa: पेळावदा रावण पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याने ( public work department )या कामाला काल संध्याकाळी तात्काळ सुरुवात केली.
pelavada ravan
pelavada ravan Dainik Gomantak

पर्ये: पावसाच्या पुराने खचलेल्या पेळावदा रावण( pelavada ravan of sattari taluka ) येथील पुलाच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याने ( public work department )या कामाला काल संध्याकाळी तात्काळ सुरुवात केली.

आज हे दिवसभर काम सुरू होते. यासाठी जे. सी. बी.च्या साहाय्याने खचलेल्या पुलाची तुटलेली लोखंडी पाईप काढून त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आली. त्यावर आता दगड आणि माती टाकणार आहे. उद्या पर्यंत हे पुलाचे दुरुस्ती काम पूर्ण होणार असून त्यानंतर यावरून वाहतूक सुरू होणार असल्याचे सांगितले. दरम्यान सरकारने याचे काम तातडीने आरंभल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

pelavada ravan
Goa Floods: सारमानस येथील पूरस्थिती नियंत्रणात; भीती कायम

दरम्यान हा पुलाचा रस्ता खचल्याने पेळावदा बागवाडा भागातील नागरिकांचे मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना केवळ गावातून बाहेर पडण्यासाठी मोर्ले बागवाडा येथून असलेल्या वाळवंटीच्या पदपुलावरून प्रवास करता येतो पण त्यांना चारचाकी वाहनांसाठी संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्या नागरिकांच्या चारचाकी वाहने घरात अडकून राहिल्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com