गोवेकरांनो वाहतुकीचे नियम मोडल्यास हजारोंच्या घरात भरावा लागेल दंड!

वास्को वाहतूक खात्याचे पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपाययोजना आखून चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.
गोवेकरांनो वाहतुकीचे नियम मोडल्यास हजारोंच्या घरात भरावा लागेल दंड!
Action on motoristsDainik Gomantak

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तालुक्यातील 43 हजार वाहन चालकांवर कारवाई (Action on motorists) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 54 लाख 7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन चालकांमध्ये नियमांबाबत जागृती करण्यासाठी अनेक उपक्रमही येथील वाहतूक पोलिसांमार्फत राबविण्यात आले. वाहतूक सुरळीत व्हावी, अपघातांवर नियंत्रण यावे आणि वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन करावे, यासाठी वास्को वाहतूक खात्याचे पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपाययोजना आखून चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Action on motorists
Youth Festival: राष्ट्रीय युवा महोत्सवात गोव्यातील 10 हजार युवकांचा सहभाग

तालुक्यात 1 जानेवारी ते 31 इसेंबर 2021 या कालावधीत वाहतूक नयम धाब्यावर बसवणाऱ्यांवर ३ हजार गुन्ह्यांची नोंद करून 54 नाख 7 हजार 600 रुपये दंडापोटी वसूल करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला. वास्को पोलिस वाहतूक खात्यात वाहूतक पोलिसांची कमतरता असतानाही नार्वेकर यांनी वाहतूक व्यवस्था योग्य तऱ्हेने हाताळण्याचे काम चोख पार पाडले. तालुक्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वाहने हाकणे, एकेरी व बंद असताना प्रवेश करणे, वाहन परवान, विमा नसणे, गणवेश न घालणे, प्रदूषण दाखला नसणे आदी प्रकरणी कारवाई करण्यात आली.

एका वर्षाच्या कालावधीत नियम मोडणाऱ्या 43001 वाहन चालकांकडून 54 लाख 7 हजार 600रु. दंड वसूल केला आहे. यामध्ये जलदगतीने वाहन चालवणाऱ्या 452 चालकांकडून 1 लाख 52 हजार रु. निष्काळजीपणाने वाहन चालवलेल्या 629 वाहन चालकांकडून 4 लाख 30 हजार 950 रु. दंडापोटी जमा केले. दारु पिऊन गाडी चालविणे 45 जणांवर

Action on motorists
16 जानेवारीला दिल्लीत होणार भाजपच्या उमेदवारांची निवड

कारवाई करण्यात आली. अशांना न्यायालय दंड ठोठावला असल्याचे सांगण्यात आले. धोकादायकपणे 5 लाख 13 हजार 450 रु. वसूल केले. हेल्मेट न घालता वाहन चालविणे 16524 जणांकडून 16 लाख 60 हजार 100 रु. दंड जमा केला. वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या 193 जणांकडून 1 लाख 22 हजार 350 रु. दंड जमा केला. ओव्हरटेक करून पुढे जाणान्या 36 जणांकडून 3600 रु. वसूल केले आहे.

रस्ता चुकीच्या पद्धतीने ओलांडणान्या 30 जणांकडून 3000 रु., योग्यप्रकारे लाईट नसताना वाहन चालवणाऱ्या 113 जणांकडून 11 हजार 300 रु. गोळा केले. प्रखर झोतात वाहन चालविणाऱ्या 42 जणांकडून 4 हजार 250 रु. दंडापोटी जमा केले, विनापरवाना 430 वाहन चालकांकडून 2 लाख 25 हजार रु. दंड वसूल केला. केबिनमध्ये प्रवाशांना बसविण्यालाख 35 हजार हजार 500 रु. दंड वसुल केला वाहनांवर अधिक प्रवासी

नेणाऱ्या 739 वाहनचालकांकडून 78 हजार 450 रु दंडापोटी जमा केले. माल वाहून नेणाऱ्या वाहनात प्रवाशी बसविणाऱ्या 33 जणांकडून 3300 रु. वसूल केले, सिट बेल्ट न घालणाऱ्या 3856 वाहन चालकांकडून 3 लाख 86 हजार 50 रु. वसूल करण्यात आले. फिल्मिंग असलेल्या 176 वाहन चालकांकडून 2 लाख 25 हजार 500 रु., नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करून ठेवलेल्या 186 जणांकडून 26 हजार 100 रु. दंड घेण्यात आला. नो एंट्रीमधून प्रवेश करणाऱ्या 3537 वाहन चालकांकडून लाख 59 हजार 50 रु. दंड भरपाई

Action on motorists
मुख्यमंत्री साहेब आता आम्हाला नोकरीत कायम करा मुरगाव पालिका कामगारांची मागणी

वसूल केली, साईड लाइट न लावता वाहन चालविणाऱ्या 100 वाहनचालकांकडून 10 हजार रु. वसूल करण्यात आले. तालुक्यातील 34 अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 हजार 650 रु. वसूल करण्यात आले. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणाऱ्या ३७६ वाहन चालकांकडून 1 लाख 88 हजार रु. तसेच इतर नियमांचे उल्लांन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.

पालकांनी मुलांमध्ये जागृती करावी

प्रत्येकाने वाहतूक नियम (Traffic Rules) पाळल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये. मुलांना वाहतूक नियमांची माहिती द्यावी. तरच ते नियमांचे पालन करतील व अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे पोलिस सुदेश निरीक्षक नार्वेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com