Goa Results : आठवडाभरात विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावेत!

गोवा फॉरवर्डची मागणी; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
Goa Students
Goa Students Dainik Gomantak

Goa Results : राज्यातील विविध महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल गोवा विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाहीत. गोवा विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. जे विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ इच्छितात अथवा नोकरी करू पाहतात त्यांच्याकडे निकाल नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. येत्या आठवडाभरात जर गोवा विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाहीत, तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असे गोवा फॉरवर्ड विद्यार्थी शाखेचे राज्य निमंत्रक उद्देश नाईक देसाई यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी विद्यार्थी शाखेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्देश नाईक देसाई म्हणाले, निकाल उशिरा जाहीर करणे ही विद्यापीठाची गेल्या काही वर्षांपासून परंपरा झाली आहे. 15 जून रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या. परीक्षा संपून 45 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर केलेला नाही. या विलंबामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे.

Goa Students
CM Pramod Sawant : भारत विश्‍वगुरू व्हावा हेच पंतप्रधानांचे स्वप्न!

विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये ‘तू तू - मै मै’

येत्या 8 दिवसांत निकाल जाहीर न केल्यास आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन तसेच उच्च न्यायालयात दाद मागू, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयांनीच त्यांच्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून विद्यापीठाकडे पाठविला नसल्याने विलंब होत असल्याचे कुलसचिव सांगतात. तर महाविद्यालये विद्यापीठाकडे बोट दाखवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com