Goa Tourism: पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू; रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी

मडगाव रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी; विविध राज्यांतील लोकांचा समावेश
Goa Crowd of railway stations
Goa Crowd of railway stations Dainik Gomantak

Goa Tourism: गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी आलेले पर्यटक आपल्या गावी परत निघाले असून त्यामुळे मडगाव येथील रेल्वे स्थानकावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेशसहित इतर राज्यांच्या पर्यटकांचा समावेश होता. कोलवा, बाणावली, केळशी, कळंगुट, मोरजी व इतर समुद्रकिनारे या पर्यटकांनी गजबजून गेले होते.

मडगाव रेल्वे स्थानकावर आपली ट्रेन पकण्यासाठी हरियाणा राज्यातून आलेल्या मनोज त्रिपाठी या युवकाने सांगितले की, येथील समुद्रकिनारे शांत असल्याने दरवर्षी आपल्या कुटुंबासोबत ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी येतो. या वर्षाची शेवटची रात्र मिरामार या समुद्रकिनाऱ्यावर साजरी केली होती.

Goa Crowd of railway stations
Girl Death: म्हापश्यात साडेतीन वर्षीय मुलीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

मडगाव रेल्वे स्थानकावरून इतर राज्यांत जाणाऱ्या सर्व रेल्वे भरलेल्या आहेत. यात केरळ राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचाही समावेश आहे आणि अशीच परिस्थिती आणखी दोन-चार दिवस असणार आहे. - बबन घाटगे, रेल्वे स्थानकाचे अधिकारी

31 डिसेंबरची रात्र आणि दोन दिवस अगोदर केळशी किनाऱ्यावर पर्यटकांमुळे चांगला व्यवसाय झाला आहे. यामुळे व्यावसायिक आनंदी होते. या पर्यटकांवर काही प्रमाणात बंधने असली तरी थर्टीफर्स्टच्या रात्रीला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.- क्रुझ सिल्वा, शॅक्स मालक, केळशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com