Goa Revolution Day: राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री सावंत यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली

Goa Revolution Day: राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री सावंत यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली
Goa Revolution Day

पणजी: आज गोव्याचा क्रांतिदिन. पंचाहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी मुसळधार पावसाची तमा न बाळगता राम मनोहर लोहिया नामक अवलियाने गोव्याच्या उरांत परचक्राच्या दमनाचा मंत्र घुमवला होता. म्हणजे यंदाचा क्रांतिदिन अमृतमहोत्सवी ठरतो. गोवा राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथिल आझाद मैदानावर शहीद स्मारकांना श्रद्धांजली अर्पण केली. चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वातंत्र्य चळवळीत गुंतलेल्या कॉंग्रेसचे एक मातब्बर नेते होते. त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांना प्रदीर्घ मुदतीची कैद भोगावी लागली. पण स्वत: ते मात्र अवघ्याच काही महिन्यांपुरते गजाआड राहिले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना जमले नाही ते त्यांनी केले. महामारीच्या सावटाखाली आपल्याला तो साजरा करावा लागतो आहे. याचा एक फायदा म्हणजे, अनावश्यक फापटपसारा असलेल्या सार्वजनिक सोहळ्यांना फाटा दिला गेलाय. त्यामुळे अनायासे संधी आलीय ती थोडेसे आत्मपरीक्षण करण्याची. आपली आजवरची वाटचाल समाधानकारक नाही यावर तर जवळजवळ एकमत होताना दिसते. मात्र वाद आहे तो या असमाधानकारक वाटचालीच्या पितृत्वाचा!

मद्रास जेलमधील आपल्या तुरुंगवासाविषयी लिहून एका उद्बोधक पुस्तिकेची निर्मिती केली. मडगावातील जमावबंदीचा आदेश मोडल्यामुळे डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासमवेत मडगावच्या पोलिस स्थानकात मला जी एक रात्र घालवावी लागली, तिच्याविषयीचा मी लिहिलेला हा वृत्तांत वाचल्यानंतर माझे गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिक मित्र मला गोव्याचा राजगोपालचारी असे म्हणणार नाहीत, अशी अपेक्षा मी बाळगतो. हे लिहून मला काही त्यांच्या उच्चतम पंक्तींत मांडीला मांडी लावून बसायचे नाही तर एक वस्तुनिष्ठ दस्तावेज इतिहासाच्या चरणी रुजू व्हावा, इतकीच इच्छा आहे. 1946 च्या उन्हाळ्यात गोवा भेटीवर आलेल्या डॉ. लोहियांना कोणताही राजकीय कार्यक्रम अभिप्रेत नव्हता. त्या दिवसात उर्वरित भारतातून सीमा ओलांडून गोव्यात येणाऱ्यांवर कोणतेच निर्बंध नसायचे. अन्य राजकीय नेत्यांबरोबर तुरुंगवासातून मुक्तता झाल्यानंतर मुंबई येथे त्वचारोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टीस करणारे डॉ. ज्युलियांव मिनेझीस - जे जर्मनीतल्या विद्यार्थीदशेपासून त्यांचे मित्र होते - यांच्या सूचनेवरून विरंगुळ्यासाठी म्हणून डॉ. लोहिया गोव्यात आले होते. छोडो भारत चळवळीदरम्यान त्यांच्या धाडसी कारवायांच्या वार्ता ऐकून प्रभावित झालेल्या अनेक गोमंतकीयांना, विशेषत: युवाजनांना ते गोव्यात आल्याचे कळल्यामुळे अत्यानंद झाला होता.

साहजिकच असोळणे येथील डॉ. लोहियांच्या यजमानांचे निवासस्थान अनेकांसाठी ‘वारी’चे स्थान बनले. मी तेव्हा मुंबईतल्या महाविद्यालयीन अध्ययनादरम्यानच्या सुटीत मडगावला आलो होतो. काही मित्रांसमवेत मीही दोनवेळा असोळणे येथे जावून डॉ. लोहियांना भेटल्याचे मला स्मरते. या भेटीदरम्यान आम्ही डॉ. लोहियांच्या कानी पोर्तुगिजांच्या छळवादाबद्दल थोडीफार माहिती घातली; येथे लोकांना सभा-बैठक घेण्याचे वा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही नसल्याचे त्यांना सांगितले. ही परिस्थिती संपवणे शक्य नसले तरी तिच्यावर काही अंशी तोडगा काढता यावा म्हणून त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली.

लक्षात घेतले पाहिजे की त्यावेळी भारताचे स्वातंत्र्य क्षितिजावर दिसू लागले होते. आमची विनंती - आर्जवे डॉ. लोहिया शांतपणे ऐकून घ्यायचे. मात्र अनेकदा वस्तुस्थिती जाणून घेत असताना ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. असेच एकदा क्षुब्ध अवस्थेत असताना या कृतीशूर माणसाने आपण स्वत:हून जमावबंदीचा आदेश मोडणार असल्याचे जाहीर करून आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिला. त्यासाठी जी जागा मुक्रर करण्यात आली तिथे आज मडगावचे पलिका उद्यान उभे आहे. आपण 18 जून रोजी दुपारी आपल्या यजमानांसमवेत तिथे उपस्थित राहीन, असे नि:संदिग्ध आश्वासन डॉ. लोहियांनी आम्हाला दिले. ठरवलेल्या वेळी डॉ. लोहिया 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com