Goa: अंजुणे धरणाच्या पातळीत वाढ; सुमारे 43 टक्के जलसाठा भरला

गोव्यात (Goa) पडत असलेल्या धो धो पावसामुळे सत्तरी गोवा ( sattari goa ) येथील अंजुणे धरणाच्या( Anjune Dam). जलाशयाच्या पाण्याची पातळी 82 मीटरवर आली आहे.
Anjune Dam
Anjune DamDainik Gomantak

गोव्यात (Goa) पडत असलेल्या धो धो पावसामुळे सत्तरी गोवा ( sattari goa ) येथील अंजुणे धरणाच्या( Anjune Dam). जलाशयाच्या पाण्याची पातळी 82 मीटरवर आली आहे. गेल्या 2-3 दिवसापासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने त्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. दरम्यान आज संध्याकाळी जलाशयाची पातळी 81.54 मीटर झाल्याने जलाशयाचा सुमारे 43 टक्के जलसाठा भरला आहे. जलाशयाचा एकूण क्षमता 4430 हेक्टर मीटर आहे.

सत्तरीतील अंजुणे धरण पूर निर्माण करणारे धरण म्हणून ओळखले जाते. धरणाची क्षमता पातळी गाठल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. धरणातून विसर्ग केलेले पाणी आणि अन्य नदीचे पाणी मिळून साखळी (sankhalim))शहर व केरी( keri), मोर्ले( morlem) , पर्ये( paryem)गावांमध्ये पूर स्थिती निर्माण होते. त्यामुळे मोठ्या पावसात अंजुणे धरणाची सतत धास्ती असते.

Anjune Dam
Goa: केरी सत्तरी चेक नाक्यावर पर्यटकांची गर्दी

पण अजूनही धरणाची उच्च क्षमता पातळी गाठायला बराच अवधी असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार नाही असे जलसंधाधन खात्याच्या सहाय्यक अभियंत्राने सांगितले. धरणाची उच्च क्षमता पातळी 93.2 मीटर आहे. पण सुरक्षतेच्या कारणास्तव धरणाची 90 मीटरच्या आसपास आल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. पाण्याचा विसर्ग करण्याअगोदर जलसंसाधन खात्यातर्फे पूर क्षेत्रातील सर्व पंचायत, नगरपालिका व संबंधित यंत्रणा यांना सतर्कतेचा इशारा देणारे नोटीस पाठवण्यात येते.

Anjune Dam
सत्तरी तालुक्यात पावसाची दिवसभर संततधार

दरम्यान गेल्या तीन वर्षांच्या पाण्याचा विसर्ग करण्याच्या तारीख अजून पुढे आहे. यात 2018 मध्ये 26 जुलैला , 2019 मध्ये 3 ऑगस्टला व 2020 मध्ये 21 जुलैला धरणातून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com