Road Accident News: गोव्यात रस्त्यावरील अपघाताची परिस्थिती चितांजनक

Road Accident News: मागील वर्षी पहिल्या 10 महिन्यांत 161 गंभीर अपघात झाले.
Road Accident |Goa News
Road Accident |Goa News Dainik Gomantak

Road Accident News: मागील वर्षाच्या (2021) तुलनेत रस्‍तेअपघातांचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी पहिल्या 10 महिन्यांत 161 गंभीर अपघात झाले. त्यात 166 जणांचा बळी गेला. यंदा पहिल्या 10 महिन्यांत अपघातांत 825 जखमी झाले. मागच्या वर्षी हे प्रमाण 637 होते. सध्या दर तिसऱ्या तासाला एक अपघात होत आहे.

चाररस्ता-माशे बगलमार्ग बनतोय ‘मृत्यूचा सापळा’

काणकोणमधील चाररस्ता-माशे मनोहर पर्रीकर बगलमार्ग मृत्यूचा सापळा होऊ देऊ नका, अशी मागणी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून करण्यात येत आहे. कारण या रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे असून लहानमोठे अपघात होत आहेत.

कोणताही नवीन रस्ता काढल्यानंतर त्याची चाचणी व पाहणी तज्‍ज्ञ समितीकडून करण्यात येते. त्या समितीने हिरवा कंदील दाखविल्‍यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो. मात्र चाररस्ता-माशे या रस्त्याच्‍या चाचणीबाबत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी संशय व्यक्त केला आहे.

Road Accident |Goa News
CM Pramod Sawant: गोव्यातील उत्पादने देशभर नेण्यासाठी GEM वर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन

7 सप्टेंबरला या रस्त्यावर राजबाग येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. एकूण सात व्यक्ती या अपघातात जखमी झाल्या होत्या. या चौपदरी रस्त्यावर भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी व्हावी अशी मागणी भंडारी यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com