Goa : नाणूस ते गांजे खोदलेला रस्ता धोकादायकच

Goa The road from Nanus to  Ganje is dangerous
Goa The road from Nanus to Ganje is dangerous

गुळेली : ओपा पाणी प्रकल्पपर्यंत गांजे (Ganje) येथील म्हादई नदीचे पाणी नेण्यासाठी गांजे ते ओपा पाणी प्रकल्पादरम्यान मोठी पाईपलाईन घालण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून गांजे ते नाणूस (Nanus) चढणीपर्यंत दरम्यान चा रस्ता (Road) अर्धा अधिक खोदण्यात आला होता. या खोदलेल्या रस्त्यामुळे वाळपई फोंडा मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान खोदलेला रस्ता दगड टाकून बुजवण्यात आला होता परंतु हे काम एवढ्या घाईगडबडीत ऊरकण्यात आले की ते व्यवस्थीत झाले नाही आणि आता जागो जागी हा रस्ता खचला आहे. (Goa The road from Nanus to  Ganje is dangerous)

रस्ता पूर्णपणे चिखलमय

गांजे ते उसगाव चढणीपर्यंत रस्ता पूर्णपणे  ह्या पाण्याच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे पूर्णपणे खराब  झाला आहे.  सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता नाणूस येथूनच चिखलमय बनला आहे तो थेट  गांजे येथे  ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारला आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा मूळे आज या रस्त्याची ही स्थिती झालेली आहे.

उसगाव भाग हा वाळपई मतदान संघात येत आहे आणि वाळपई मतदान संघातीलच गुळेली ,खोतोडा सावर्डे, तसेच वाळपई नगरपालिका भागातील बहुसंख्य लोक या रस्त्याचाच अधिक वापर फोंडा मडगांव भागात जाण्यासाठी करताच त्यामुळे या भागाचे आमदार या नात्याने सदर रस्त्याचे काम का झालं नाही याची चौकशी करायला पाहिजे होती मात्र रस्त्याची एकूण स्थिती पाहता तसं झाल्या नसल्याचे कळते. या रस्त्याला आणि त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणी वालीच राहिला नाही अशी एकूण स्थिती वरुन दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com