Goa: राष्ट्रीय महामार्ग - 17 B वरील दुभाजक तोडून केला रस्ता

रस्ता वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport)त्वरित कारवाई करावी. आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करून येथील महामार्गाच्या मधोमध पुन्हा दुभाजक बसवावा.
Goa: राष्ट्रीय महामार्ग - 17 B वरील दुभाजक तोडून केला रस्ता
दाबोळी येथे दुभाजक तोडून तयार केलेला रस्ता.Dainik Gomantak

दाबोळी: आल्त दाबोळी ते वालेस जंक्शन पर्यंत राष्ट्रीय महामार्ग - 17 B वरील दुभाजक मधोमध जे तोडून रस्ता केला आहे. त्याबाबतची तक्रार केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालय येथे केली होती. सदर तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी MPT रस्ता आस्थापनाला संबंधिता विरुद्ध त्वरित कारवाई करण्याचा आदेश भारत सरकारतर्फे (Government of India)काढण्यात आले आहेत. याची बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे.

वेर्णा ते वास्को (Vasco)मांगोरहील पर्यंत राष्ट्रीय महामार्ग - 17 B पर्यंत प्राधिकरणातर्फे सात दुभाजक आहेत. यात एका दुभाजकाला अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे परवानगी दिलेली नाही. एवढे असताना सुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक नियंत्रण खासगी कंपनीतर्फे सिग्नल्स बसवलेले आहेत. तसेच काही महिन्यापर्वी अल्तो दाबोळी ते वालेस जंक्शन ते बोगमाळो वळणापर्यंत अंदाजे शंभर मीटरच्या आत राष्ट्रीय महामार्गाच्या असलेला दुभाजक तोडून रस्ता केलेला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध दुभाजक तोडून एका प्रकारे संबंधिताने गुन्हा केला असून त्या संबंधीच्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी, यासाठी गोवा फर्स्टचे केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालय भारत सरकारच्या विभागात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेऊन मुरगाव पत्तनाच्या रस्ता आस्थापनाला चौकशी करण्याचा आदेश जारी केले आहेत. अशी माहिती तक्रारदार गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम यांनी दिली आहे.

दाबोळी येथे दुभाजक तोडून तयार केलेला रस्ता.
Goa : ‘दाबोळी’च्या शहरीकरणाला समस्‍यांचा विळखा

तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेला दुभाजक बेकायदेशीर तोडल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशीही माहिती सोनुर्लेकर यांनी दिली.

याविषयी गोवा फर्स्टचे सोनुर्लेकर यांना विचारले असता सदर या राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी केंद्रीय अधिकारी, राज्य अधिकारी करतात. यातील एकही अधिकाऱ्यांच्या नजरेस हे बेकायदेशीर कृत्य कसे लक्षात येत नाही. रस्ता वाहतूक मंत्रालयाने त्वरित कारवाई करावी. आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करून येथील महामार्गाच्या मधोमध पुन्हा दुभाजक बसवावा, अशी मागणी गोवा फस्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com