Goa: काणकोणात तब्‍बल अठरा दिवसांनी बुजवला खड्डा

चावडी-काणकोण (Cancona, Goa) येथील जुन्या बसस्थानकासमोरील (Old Bus Stand) रस्त्यावर अठरा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे खोदलेला खड्डा (Road Work after 18 days) बुजविण्‍यात आला.
Goa: काणकोणात तब्‍बल अठरा दिवसांनी बुजवला खड्डा
Goa: Road Work in Chavadi-Cancona.Daily Gomantak

आगोंद : चावडी-काणकोण (Cancona-Goa) येथील जुन्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर अठरा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे खोदलेला खड्डा दि. २३ रोजी जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्दळीच्या ठिकाणी असलेला खड्डा अनेकांना त्रासदायक ठरत होता. मात्र, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १८ दिवसानंतर हा खड्डा बुजवण्यास सुरुवात केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Goa: Road Work in Chavadi-Cancona.
Goa: चोर्ला घाटात अखेर बारा तासानंतर वाहतूक सुरळीत

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून या ठिकाणी जलवाहिनी करता रस्ता खोदून काम करण्‍यात आले. याठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासंबंधी अनेकांनी तक्रार सुद्धा केली होती. मात्र, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्‍याची दखल घेतली नाही, असा दावा स्थानिक रहिवासी शंकर नाईक यांनी केला. काणकोण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जलस्रोत विभागाकडून शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने हा धोकादायक खड्डा बुजवल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Goa: Road Work in Chavadi-Cancona.
Goa: अंजुणे धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; चारही दरवाजे खुले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com