Goa Robbery News : वाठादेव-सर्वणमध्ये घरफोडी; तब्बल 5.44 लाखांचा मुद्देमाल लंपास

Goa Crime News : गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
Goa Robbery News
Goa Robbery NewsDainik Gomantak

Goa Crime News : गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसाढवळ्या चोरी, मारामारीचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच मिळालेल्या महितीनुसार वाठादेव - सर्वण डिचोली इथे घरफोडी झाली आहे. पोलिस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Goa Robbery News)

Goa Robbery News
Sal River: ग्रामस्थांनी आवाज उठवावा -रॉयला फर्नांडिस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरातून घरफोडी झाली आहे, त्या घरातून तब्बल 5.44 लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. गोव्यात चोरीच्या आणि घरफोडीच्या अशा घटना गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत.

दरम्यान, फोंडा तालुक्यात असलेल्या खांडोळा महागणपती देवस्थान चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल तीन महिन्यांनी चोरीचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आलं आहे. संतोषकुमार परमानंद दास (वय 42 रा.ओडिशा) असं मुख्य आरोपीचं नाव असून त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com