Goa: ‘रोझरी’ विद्यालयाचे विद्यार्थी संतप्त

अकस्मात ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयावरून वाद (Goa)
Goa: Image Kutinho presenting an argument on behalf of Rosary School students.
Goa: Image Kutinho presenting an argument on behalf of Rosary School students. Dainik Gomantak

Goa: सुरवातीला ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेणार असे सांगून आता शेवटच्या क्षणी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाने (Rosory Higher Secondary School) घेतल्याने बारावीचे विद्यार्थी घाबरून गेले असून, काही संतप्त विद्यार्थ्यांनी आज (गुरुवारी) आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो (AAP Party Vice President Pratima Kutinho) यांच्याबरोबर रस्त्यावर येणे पसंद केले. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरवातीला ऑनलाईन परीक्षा घेणार असे सांगण्यात आले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना सोमवारपासून या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येतील असे सांगत परीक्षेचे वेळापत्रकही (Time Table) पाठवून दिल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.

Goa: Image Kutinho presenting an argument on behalf of Rosary School students.
Goa: संपुर्ण राज्य बाजार क्षेत्र म्हणून खुले करण्याची मागणी

यावेळी बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी एका बाजूने मुख्यमंत्री प्रमोद सावंत ज्या विद्यार्थ्यांना कोविडची लस दिली गेली अशासाठी फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होतील असे सांगतात आणि दुसऱ्या बाजूने लस दिलेल्या १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेऊन त्यांना कोविडच्या दाढेत कशाला ढकलू पाहत आहेत, असा सवाल करून आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. (Goa)

Goa: Image Kutinho presenting an argument on behalf of Rosary School students.
Goa: चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com