Goa: आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित सहस्त्र दिपोत्सव साजरा

तेल आणि मातीचे दिवे लावताना अंतरंगाचे, आत्म्याचे, मनाचे असे काही दिवे प्रज्वलित करू शकतो का?
Goa: आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित सहस्त्र दिपोत्सव साजरा
दिपोत्सवDainik Gomantak

दाबोळी: गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन (Ayurvedic Medical Association) तर्फे आयोजित सहस्त्र दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्त्यांच्या व्याख्यानातून रामकथा, दीपोत्सव व आयुर्वेद याविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.

गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन तर्फे रवींद्र बायणा वास्को व आरोग्य (Health) भारतीच्या सहकार्याने कार्तिक पौर्णिमेनिमित्त रवींद्र भवन येथे सहस्त्र दीपोत्सव कार्यक्रमाचे (program) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव, सन्माननीय अतिथी म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, खास अतिथी म्हणून आरोग्य भारती कवा प्रांतचे सहसचिव डॉक्टर आदित्य बर्वे तसेच गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाई, सचिव डॉक्टर नितीन मांजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दिपोत्सव
Goa: धनगरी फुगडीचे मिळाले नवीन पीढीला धडे

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर उपस्थितांचे स्वागत डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाई यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रमुख पाहुणे जयंत जाधव (Jayant Jadhav) यांनी आपल्या भाषणात गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले व आयुर्वेदा विषयी थोडी माहिती दिली. तद्नंतर सन्माननीय अतिथी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी रामकथा या विषयावर व्याख्यान देऊन डोळ्यासमोर रामायण उभे केले.

आपल्या जीवनामधील अडचणींचे निवारण करण्यासाठी रामायण आपल्याला काय सांगते, रामायणातील कथा प्रचंड महासागर आहे. आपण हे जीवन जगतो आहे ते रामायणातील (Ramayana) या कथा आपल्या जगण्याला कोणता दिवा दाखवतात. रामायण वाचल्यानंतर मला असं वाटतं की मी बाहेर असणारे तेल आणि मातीचे दिवे लावताना अंतरंगाचे, आत्म्याचे, मनाचे असे काही दिवे प्रज्वलित करू शकतो का? आणि ते प्रज्वलित करण्यासाठी ब्रह्म ज्योती, आत्मज्योती,गुरुरज्योती प्रज्वलित झाले पाहिजे.

दिपोत्सव
Goa: बेरोजगाराना खोटी आश्वासने देऊन थट्टा करण्याचे लोकप्रतिनीधीनी थांबवावे

सामर्थ्य रामायण कथेत असल्याचे सांगून रामायणातील केवळ कथा, त्यातले नाट्य,रंजन, काव्य न सांगता आपण सगळे एक कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, राजकीय जीवन अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये जीवन जगत आहोत. त्या राम कथेच्या माध्यमातून जीवन जगणे समजावून घेता येईल का? नुसतं समजावून नाही, मला चांगलं जीवन जगता येईल का? अशी सुंदर उदाहरण देऊन आपल्या रसाळ व्याख्यानातून जीवनाचा पैलू रामायणातील काही प्रसंगांमधून अनिल सामंत यांनी उभा केला.

यावेळी आरोग्य भारती गोवा प्रांतचे सहसचिव डॉक्टर आदित्य बर्वे यांनी दीपावली विधीत आयुर्वेदाची भूमिका या विषयावर सुंदर व्याख्यान देऊन या कार्यक्रमात रंगत भरली.व्याख्यानाच्या कार्यक्रमा नंतर रवींद्र भवन परिसरात हजारो पणत्या पेटवून सहस्त्र दिपोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास आयुर्वेदिक डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com