राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला; मडगावनंतर साखळीही ‘हॉटस्‍पॉट’

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात १ हजार १४५ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ३२४ जण पॉझिटिव्ह आढळले, ४८५ जणांना घरगुती अलगीकरण करण्यात आले. २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पणजी: राज्यात मडगाव पाठोपाठ आता साखळी कोरोना रुग्णांच्या बाबतीत हॉटस्पॉट बनले आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या हद्दीत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज ४६३ वर गेली आहे. तर साखळी आरोग्य केंद्राच्या हद्दीत आढळलेल्या रुग्णांची संख्या ४२८ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ३६०वर गेली आहे. काल (रविवार) मृतांची संख्या ३५१ वर गेली होती. 

आज दिवसभरात १ हजार १४५ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ३२४ जण पॉझिटिव्ह आढळले, ४८५ जणांना घरगुती अलगीकरण करण्यात आले. २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारामुळे ४२९ जणांना घरी सोडण्यात आले. राज्यात एकूण ५ हजार ६६७ रुग्ण सक्रिय संक्रमित आहेत.

आज झालेल्या मृतांमध्ये सावंतवाडी येथील ५९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. त्याचबरोबर माशेल-फोंडा येथील ६४ वर्षीय पुरुष, शिवोली येथील ६२ वर्षीय पुरुष, पाळे-डिचोली येथील ६९ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ५० व ७१ वर्षीय पुरुष, नावेली-मडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष,  सायगाव येथील ७० वर्षीय पुरुष आणि गुळेली - सत्तरी येथील ८८ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.

पेडणे तालुक्यातील आज एकोणीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. मोरजी १, पालये १, पार्से ३, आगरवाडा १, मांद्रे ३, तुये १, हरमल ३, विर्नोडा १, पेडणे १, वळपे ३, कोरगाव १. यातील काही रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले, तर काहींना कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.

फोंडा तसेच पिळये आदी आरोग्य केंद्रात कोरोनाचे किमान पन्नास रुग्ण सापडत आहेत. फोंड्यातील आयडी उपजिल्हा कोविड इस्पितळ फुल्ल झाले असून राज्यातील कोरोना रुग्णांना आता मडगावच्या इस्पितळात हलवण्यात येत आहे. फोंडा शहर परिसरातही कोरोना रुग्ण सापडत असून विशेषतः फोंडा पालिका क्षेत्राबरोबरच लगतच्या कुर्टी पंचायतक्षेत्रातही कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने लोकांनी धास्ती घेतली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या