Goa River: साळ नदीत सोडले जाणारे सांडपाणी विरोधी; व्हेंझी व्हिएगसांची दक्षता खात्याकडे तक्रार

Goa Sal River: साळ नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते व सरकार त्यावर काहीही उपाय करीत नाही.
Goa River | Venzy Viegas
Goa River | Venzy ViegasDainik Gomantak

Goa Sal River: साळ नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते व सरकार त्यावर काहीही उपाय करीत नाही, असे कारण देऊन बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ व सांडपाणी साधनसुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दक्षता खात्याकडे तक्रार नोंद केली आहे.

आपल्या तक्रारीत आमदार व्हिएगस यांनी म्हटले आहे की, जीएसपीसीबीचे सदस्य सचिव तसेच एसआयडीसीजीएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी साळ नदीत सोडलेले प्रक्रिया न केलेले सांडपाणी अडविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. जे सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते ते अडविण्यासाठी एसटीपी प्लांटला ऑपरेटिंग व्हॉल्व नाही याची माहिती दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांना होती.

Goa River | Venzy Viegas
Goa BJP: अबब! शंभर कोटींची मानहानी? 'खरी कुजबूज'

8 जून 2021 रोजी जेव्हा याची पाहणी झाली, तेव्हा जिथून सांडपाणी नदीत जाते अशी सहा ठिकाणे शोधून काढण्यात आली होती. अजूनपर्यंत या ठिकाणांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. त्यामुळे साळ नदी प्रदूषित होत आहे. दरम्यान, आमदार व्हिएगस यांनी आज पुन्हा साळ नदीची पाहणी केली. यावेळी मंत्री, अधिकारी येणार असे सांगण्यात आले होते. मात्र, कोणीही फिरकले नाहीत.

हा तर फौजदारी गुन्हा...

मुद्दामहून जलाशयात सांडपाणी सोडणे हा भारतीय दंड संहितेच्या 277 व्या कलमानुसार फौजदारी गुन्हा आहे. शिवाय भारतीय घटनेच्या 21 व्या कलमानुसार मूलभूत अधिकार विरोधी आहे, असे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल दक्षता खात्याने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com