Goa Sand Extraction: ट्रक रस्‍त्‍यावरच झाला उभा!

डिचोलीतील घटना: विचित्र व भयानक अपघातात अनर्थ टळला
Goa Sand Extraction: ट्रक रस्‍त्‍यावरच झाला उभा!
Illegal Sand Mining in GoaDainik Gomantak

डिचोली: रेती वाहून नेताना तोल गेल्याने एक ट्रक चक्क रस्त्यावरच पुढील चाके वर अशा अवस्थेत उभा होण्याची घटना आज गुरुवारी वाठादेव-डिचोली येथे घडली. सदर छायाचित्र बघून या विचित्र तेवढ्याच भयानक प्रसंगाची कल्‍पना येते. सुदैवाने अपघात टळला आणि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ट्रकचालक मोठ्या संकटातून बचावला अशाच प्रतिक्रिया या घटनेनंतर व्यक्त होत होत्या.

Illegal Sand Mining in Goa
गोव्यात काजू फेणीच्या उत्पादनात झाली घट...

यासंबंधीची माहिती अशी की, राज्य महामार्गाअंतर्गत सध्या डिचोलीत बगलमार्गाचे काम जोरात सुरू आहे. न्यूवाडा-वाठादेव परिसरात रस्ता सपाटीकरणाचे काम करण्‍यात येत आहे. रेती वाहून नेताना एक ट्रक चढणीवरच पुढील चाके वर असा सरळ उभा झाला. सुदैवाने ट्रक मागच्या मागे पलटी होण्यापासून बचावला. लागलीच जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ट्रक सरळ करण्यात आला. या ट्रकामध्ये माती जास्‍त भरल्याने चढणीवर मागे तोल गेला आणि हा अपघात घडला. म्हणतात ना, ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...'' त्याचाच प्रत्यय या विचित्र अपघातानंतर आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.