Sanjay Raikar: सांगे व्यायामशाळा होणार अद्ययावत

Sanjay Raikar: सरकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
Sanjay Raikar | Goa News
Sanjay Raikar | Goa News Dainik Gomantak

Sanjay Raikar: गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेली सांगेतील शासकीय व्यायामशाळा अद्ययावत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या व्यायाम शाळेची दुर्दशा त्वरित सुधारावी म्हणून सांगेचे माजी नगराध्यक्ष आणि क्रीडापटू संजय रायकर यांनी विविध स्थरावर पत्रव्यवहार करून अनेकदा निवेदने सादर केली होती.

त्याला प्रतिसाद म्हणून क्रीडा खात्याचे अधिकारी नवीन आचार्य, दिनेश नाईक आणि इतरांनी व्यायाम शाळेची पाहणी करून तेथील स्थिती जाणून घेतली. यावेळी अधिकारी नवीन आचार्य म्हणाले, की सांगेच्या शासकीय व्यायामशाळेची स्थिती आम्ही पाहिली असून त्यासंदर्भात अहवाल क्रीडा खात्याला सुपूर्द करणार आहे.

त्यानंतर क्रीडा खाते निर्णय घेणार आहे. गोवा भरातील शासकीय व्यायामशाळा आणि कुडचडेतील व्यायाम शाळा पाहिल्यास सांगेच्या व्यायाम शाळेत दहा टक्केही क्रीडा साहित्य नाही. क्रीडापटूंची भावना झाली आहे की सांगे हा ग्रामीण भाग असल्यामुळे सर्वच गोष्टीत सरकार उशिरा लक्ष देते.

सध्या व्यायाम शाळेत असलेले साहित्य हे जुने जीर्ण झालेले असून इतर सर्वत्र नवीन साहित्य दिले जात असताना सांगेच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात असल्याचा ठपका क्रीडापटूंकडून ठेवला जात आहे.

Sanjay Raikar | Goa News
Uniform Civil Code : काहीही होऊदे; देशात समान नागरी कायदा लागू करणारच

व्यायामशाळेला उपकरणे देण्याची मागणी

सांगेच्या व्यायामशाळेसाठी नवीन उपकरणांची यादी संजय रायकर यांनी क्रीडा खात्याला सादर केली आहे. त्यातील सर्व साहित्य एकाच वेळी दिल्यास किमान चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून सरकार ला सर्व साहित्य एकदाच देणे शक्य नसल्यास दोन टप्यांत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com