Goa IIT: अखेर आयआयटी विरोधकांचा विजय; सांगेत जल्लोष

Goa IIT: शेतकऱ्यांना कचाट्यात अडकविण्‍याचा पोलिसांचा हा प्रयत्न असफल ठरला आहे.
Goa IIT
Goa IITDainik Gomantak

Goa IIT: गेल्‍या 5 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सांगे दौऱ्यावर आले असता त्‍यांना काळे झेंडे दाखविण्‍याची तयारी करणे व त्याच दिवशी 144 कलमाचा भंग करणे असा ठपका ठेवून आयआयटी विरोधक शेतकऱ्यांवर उपजिल्हाधिकारी कार्यालयात सांगे पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

त्याची अंतिम सुनावणी पूर्ण होऊन उपजिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी सांगे पोलिसांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली नसल्‍याचे निरीक्षण नोंदविले. तसेच या आरोपात काही तथ्य नसल्याने पोलिसांचा दावा फेटाळून लावला. साहजिकच आयआयटी विरोधक शेतकऱ्यांनी हा आपला विजय मानून जल्लोष केला.

Goa IIT
Dance Bar: गोव्यातील बेकायदेशीर डान्‍सबारवर कारवाई सुरुच

जोसेफ फर्नांडिस म्हणाले की, हा निकाल म्हणजे ‘सत्यमेव जयते’ आहे. केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दबावाखाली येऊन पोलिसांनी त्‍यांना अडकविण्यासाठी केलेला प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. आता तरी पोलिसांनी आपल्‍या पदाची शान राखण्यासाठी योग्य मार्गाने तपास करणे आवश्यक आहे.

तर, मिल्टन फर्नांडिस म्हणाले की, यापूर्वी खोट्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत आणि पुढेही नोंदविल्या जातील. पण त्यामुळे शेतकरी घाबरणार असल्याचा कोणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. अशा प्रकारचे खोटे गुन्हे नोंद केले म्हणून शेतकरी घाबरणार नाहीत. दरम्‍यान, सांतान रॉड्रिगीस यांनीही आपले विचार मांडले.

न्‍यायदेवतेने दिला सत्‍याच्‍या बाजूने निकाल

5 ऑक्टोबरला दसरा सण होता. त्या दिवशी स्थानिक आमदार बाजारात मिरवणूक काढत होते. मुख्यमंत्री 200 लोकांना घेऊन सांगेत मंदिराची पायाभरणी करीत होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळच साप्‍ताहिक बुधवारचा बाजार गजबजला होता. असे असतान फक्त पीडित शेतकरी वगळता अन्‍य कोणावरही 144 कलम भंग केल्याचा आरोप लागला नाही.

शेतकरी दांडो येथे एकत्र होणार आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार म्हणून त्‍यांच्‍याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायदेवतेने सत्याच्या बाजूने निकाल दिला आहे, असे कॉस्ताव मास्कारेन्हस यांनी सांगितले.

ॲड. स्टेन्‍ली रॉड्रिगीस, शेतकऱ्यांचे वकील

केवळ शेतकऱ्यांची सतावणूक करण्यासाठी खोट्या माहितीच्या आधारे हा खटला दाखल करण्‍यात आला होता. कोणताही आधार नसताना शेतकऱ्यांना कचाट्यात अडकविण्‍याचा पोलिसांचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. मी मांडलेला मुद्दा उपजिल्हाधिकाऱ्यांना पटला. निकालाबद्दल मी समाधानी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com