Goa IIT Project: 'आयआयटी' प्रकल्प झुआरीच्या जमिनीत आणून हा महाघोटाळा थांबवा

Goa IIT Project: जमीन वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Goa IIT Project
Goa IIT ProjectDainik Gomantak

Goa IIT Project: सांगे येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला शेतकरी विरोध करत आहे. तसेच प्रकल्पासाठी निश्‍चित केलेली 7 लाख चौरस मीटरची जमीन अपुरी असून त्यासाठी 12 लाख चौरस मीटर जमिनीची आवश्‍यकता असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आयआयटी प्रकल्प झुआरी कोमुनिदाद जमिनीत आणून झुआरीचा महाघोटाळा थांबवा, अशी माहिती माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

सांकवाळ कोमुनिदाद यांनी एमएस बिर्ला यांना 1968 मध्ये 55 लाख चौरस मीटर जमीन दिली होती. ज्या उद्देशासाठी देण्यात आली होती, त्यासाठी त्यांना आत्ता जमिनीची गरज नाही. कोमुनिदादची 50 लाख चौरस मीटर जमीन विकण्याचा प्रयत्न होत असून सहा हजार कोटींचा घोटळा होण्याची शक्यता आहे.

कोमुनिदाद जमीन विकण्याचा मनसुबा एका विशिष्ट लॉबीचा हेतू असून जिथे अनेक बिल्डर्स आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स अनेक स्थानिक राजकारण्यांच्या मदतीने यात सहभागी आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमीन वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे चोडणकर म्हणाले.

Goa IIT Project
Goa Framers Demand IIT Project: आमची जमीन सोडून सांगेत कुठेही ‘आयआयटी’ उभारा; शेतकऱ्याची मागणी!

...जमिनीसाठी धडपड

सांकवाळच्या नारायण नाईक यांचे कौतुक केले पाहिजे, कारण त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. गोमंतकीय आपली जमीन वाचवण्यासाठी धडपडत आहे, परंतु सरकार त्यांच्या विविध तक्रारींना प्रतिसाद देत नाही. तसेच कारवाईही केली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी खंत चोडणकर यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com