Goa Mine: 'त्या' पुरातन कोरीव कामाची तपासणी होणार

Goa: सरकारतर्फे खंडपीठाला माहिती तपासणीसाठी 'एएसआय'चे पथक गोव्यात येणार
ASI Expert Team
ASI Expert TeamDainik Gomantak

Sanguem: सांगे येथील भागात सापडलेल्या खडकावरील पुरातन कोरीव कामाच्या तपासणीसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे ASI Expert Team तज्ज्ञ पथक नेमण्यात आले असून ते पावसाळ्यानंतर गोव्यात येणार आहे.

तेथील बेकायदेशीर चिरेखाणीप्रकरणी गुन्हा नोंदवून लवकरच आरोपपत्र सादर केले जाईल. चिरेखाणी केलेल्यांना खाण खात्याने कारणेदाखवा नोटीस देऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाईची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आज ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सुनावणीवेळी दिली. पुढील सुनावणी 11ऑक्टोबरला ठेवली आहे.

ASI Expert Team
Sanguem: सांगे आयआयटी प्रकल्प परिसरात 144 कलम लागू

सांगे येथे खडकावरील पुरातन कोरीव कामापासून काही अंतरावर बेकायदा व अनधिकृत चिरेखाणी गेली कित्येक वर्षे सुरू असून त्याप्रकरणी तक्रार देऊनही कोणतीच कारवाई खाण खाते किंवा पोलिसांकडून होत नसल्याबद्दल गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली होती.

पोलिस व सरकारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी धारेवर धरले होते. मुख्य सचिवांना यासंदर्भात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सांगे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून चिरेखाणी केलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच आरोपपत्र सादर करण्याच्या तयारी पोलिस आहेत.

कारवाईचे निर्देश

या याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना या प्रकरणाला जबाबदार असलेल्या पोलिसांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, असा प्रश्‍न केला. त्यावर पांगम यांनी ही माहिती पुढील सुनावणी देण्यात येणार असल्याचे उत्तर दिले. या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने अशा प्रकारे बेकायदा व अनधिकृतपणे सुरू असलेल्या चिरेखाणींचा वा तेथील चिरे काढून बंद असलेल्या भागांचा शोध घेऊन खाण खात्याने कारवाई करण्याचेही निर्देश मागील सुनावणीवेळी देण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com