Goa: सांगेवासीयांचा 'इको सेन्सिटिव्ह झोन'ला विरोध

Goa: झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले त्या गावातील लोकांनी एकत्र येऊन वाडे कुर्डीत सभा घेतली.
Goa |
Goa | Dainik Gomantak

Goa: काही गाव हे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आल्याने सांगेवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. जे गाव या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले त्या गावातील लोकांनी एकत्र येऊन वाडे कुर्डीत सभा घेतली आणि खेड्यापाड्यात जनजागृती करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले.

दरम्यान, त्याचा समारोप 13 नोव्हेंबरला होणार असून भव्य जाहीर सभा घेण्याचा एल्गारही काल झालेल्या सभेतून करण्यात आला. वाडे कुर्डी गणेशोत्सव मंडळाच्या सभामंडपात झालेल्या सभेला ॲड. आनंद गावकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, भाटीचे सरपंच चंद्रकांत गावकर, उपसरपंच प्रियांका गावकर, पंच अश्विनी गावकर, वाडे कुर्डीचे पंच चंदन उनंदकर उपस्थित होते.

Goa |
Goa Trinamool: नगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी 'भाजप' सरकारची धडपड!

पर्यावरण संवेदनशील झोनमध्ये सांगेतील कुर्डी, साळावली, रिवण, कोळंब, नायकिणी, नुने, पाटे, उगे, तुडव, पोत्रे, विलियण, डोंगरे, पोट्टे, नेत्रावळी, वेर्ले, भाटी, कुमारी, शिगोणे या महसुली गावांचा समावेश आहे.

तसेच, अध्यक्ष आनंद नाईक म्हणाले, की गेल्या वेळी आम्ही असाच उठाव केला असता आम्हाला ही गावे वगळणार, असे सरकारकडून सांगण्यात आले होते, मात्र त्याच गावांचा समावेश केल्यामुळे आता उठाव केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यावेळी चंदन उनंदकर यांनीही आपले विचार मांडले.

Goa |
Goa Driverless Car: पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच; गोव्यात अवतरली चक्क 'ड्रायव्हरलेस कार'

59 ऐवजी 69 गावे पर्यावरण संवेदनशील

गोव्यातील गावांचे दोन महसुली गावांमध्ये विभाजन करण्याचे राज्य सरकारने प्रस्तावित केले आहे. पश्‍चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील म्हणून 99 गावांच्या ऐवजी 69 गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. मंत्रालयाने या वर्षी जुलैमध्ये मसुदा अधिसूचनेत गोव्यातील 99 गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून सूचीबद्ध केली होती, परंतु त्याला विरोध केला होता.

केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून 59 गावे येत असल्याचे सांगितले आहे. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या दहा गावांचा काही भाग पर्यावरण संवेदनशील असल्याने त्यांचा समावेश केल्याचे काब्राल यांनी पत्रात म्हटले आहे.

Goa |
Goa Illegal Business: गोव्यात बेकायदेशीर व्यवसाय नकोच- माविन गुदिन्हो

वासुदेव गावकर (माजी आमदार)-

हा विषय आपण सरकारच्या कानावर घालणार असून ग्रामीण भाग अशा वेगवेगळ्या झोनमध्ये अडकल्यास जनतेला त्रास भोगावे लागणार आहेत. त्यामुळे सरकारने याचा पुन्हा विचार करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com