Goa News : रुग्ण व विकलांगांच्या सेवेत गोवा अव्वल

राज्यपाल पिल्लई : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
Sanquelim
SanquelimDainik Gomantak

साखळी : आरोग्य क्षेत्रात रुग्णांना मोफत सेवा देण्यात तसेच विकलांग लोकांना चांगली सरकारी पातळीवरील सेवा पुरविण्यात गोवा राज्य हे देशात सर्वोत्कृष्ट राज्य आहे. लोकांच्या सेवेसाठी काम करताना राज्यात खासगी कंपन्यांकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीचा वापर करावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालताना राज्याला अशाप्रकारच्या सेवेतही स्वयंपूर्ण बनवावे.

त्यांच्या नेतृत्वाखाली आज गोवा राज्य स्वयंपूर्णतेकडे यशस्वी वाटचाल करीत आहे, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही चांगले सहकार्य राज्याला लाभत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साखळी येथे केले.

राज्यपाल निधीतून डायलिसिस व कर्कग्रस्त रुग्णांना आर्थिक साहाय्य वितरण तसेच विकलांग आयोगातर्फे अपंग रुग्णांना ब्रेन कंट्रोल मायोइलेक्ट्रीक हात वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, विकलांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव उपस्थित होते.

Sanquelim
Hospicio Hospital : ...तर ९ कोटी लोकांना मानसिक रोग; ‘लांसेट’ संशोधनाचा दावा

यावेळी डॉ. इर्शाद काजी व निरज सक्सेना यांनी विचार मांडले. आत्तापर्यंत राज्यपालांकडून सुमारे 2.75 कोटी रुपयांची मदत समाजातील विविध आजारी घटकांना आर्थिक साहाय्य वितरित केले आहे, असे एम. आर. एम. राव यांनी सांगितले. साखळीत रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात 74 जणांना आर्थिक साहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन सिध्दी प्रभू यांनी केले, तर गुरुप्रसाद पावसकर यांनी आभार मानले.

Sanquelim
Anupam Mittal in Hospital: शार्क टॅंक अनुपम मित्तल हॉस्पिटलमध्ये? व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

लवकरच उपकरणांसाठी केंद्र

अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्त्वावर केंद्र व गोवा सरकार काम करीत आहे. लोकांना पुन्हा ऊर्जा व उमेद प्राप्त व्हावी व विकलांग लोक पुढे यावे यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. त्यासाठीच लवकरच गोव्यात अपंग लोकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या यंत्र व उपकरणांचे कायमस्वरूपी केंद्र स्थापन केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

50 ते 60 हजार लोकांना अशाप्रकारच्या यंत्रांची गरज असून वाढते अपघात व त्यामुळे येणाऱ्या अपंगत्वावर मात करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. कर्क रोगाच्या रुग्णांसाठी मेडिक्लेम योजनेद्वारे यापूर्वी दीड लाख रुपये मिळत होते, ते आता पाच लाख रुपये करण्यात येणार आहे. उच्च मधुमेह असलेल्यांनी काळजी घेताना आपल्याला किडनी विकार न होण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

Sanquelim
Sonia Gandhi Hospitalized: सोनिया गांधींची तब्येत बिघडली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

‘आजाराविरुद्ध लढण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी’

समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी म्हटले की, कॅन्सर व डायलेसिस रुग्णांना आशेचा किरण म्हणजे हे सरकार आणि राज्यपाल आहेत. कॅन्सरसारख्या आजाराला न घाबरता आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी. तेव्हाच या आजाराशी लढण्याची ताकद मिळेल. देशाच्या सीमेवर शत्रूशी लढा देताना गोळ्या लागून हात किंवा पाय गमावलेल्या सैनिकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम येणाऱ्या काळात लवकरच आयोजित केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com