PM Kisan Scheme: 'पंतप्रधान किसान समृध्दी'चा साखळीत दिमाखात शुभारंभ

PM Kisan Scheme: गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
PM Kisan Scheme
PM Kisan Scheme Dainik Gomantak

PM Kisan Scheme: कारापूर- साखळी येथे अडव्हेंटज ग्रुपच्या पारादीप फॉस्फेट लिमिटेड व जय किसान जंक्शनचे रुपांतर झालेल्या ‘पंतप्रधान किसान समृध्दी‘ या केंद्राचे आमदार तथा गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारकडून पंतप्रधान भारतीय जन खत प्रकल्प ‘एक देश एक खत'' या नव्या योजनेंतर्गत सर्व खत कंपन्यांचे भारत या एकाच ब्रँडखाली अनुदानित खतांची विक्री करण्यास सुरुवात झाली आहे.

PM Kisan Scheme
Goa Accident Cases: अपघात कसे रोखायचे सांगा; जनतेचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न!

या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आत्मा उत्तर गोवाचे प्रकल्प संचालक किशोर भावे, विभागीय कृषी विभाग डिचोलीचे प्रसाद जोग, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद कारखांडे आणि अडव्हेंटज ग्रुपचे सहाय्य्क व्यवस्थापक मंदार सावईकर आदी उपस्थित होते.

झुआरी अडव्हेंटज ग्रुपचे सहाय्यक व्यवस्थापक मंदार सावईकर यांनी रसायन तथा खत मंत्रालय व पारादीप फॉस्फेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री कृषी समृध्दी केंद्राची माहिती दिली.

PM Kisan Scheme
Goa News: 'मधमाशी पालन' करुन बेरोजगारीवर केली मात!

शेतीत वेगळा ठसा उमटविणारे विनोद बर्वे, उदय भाटे, सखाराम पेडणेकर, लक्ष्मीकांत धोंड या प्रगतशील शेतकऱ्यांचा आमदार शेट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुमित दळवी यांनी सूत्रसंचालन केले. सागर सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखाराम गावकर यांचे सहकार्य लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com