Goa: संस्कृती भवनात मोडी-मराठी दस्तऐवजांचे खास प्रदर्शन

Goa: जमीन दाखल्यांचे लवकरच डिजिटलायझेशन केले जाईल.
Goa: संस्कृती भवनात मोडी-मराठी दस्तऐवजांचे खास प्रदर्शन

Goa: पुराभिलेख खात्याकडे असलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे, जमीन दाखल्यांचे लवकरच डिजिटलायझेशन केले जाईल, अशी माहिती खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. पुराभिलेख खात्यातर्फे पाटो पणजी येथील संस्कृती भवनात आयोजित मोडी-मराठी दस्तऐवजांच्या खास प्रदर्शनाचे उद्‍गार केल्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी पुराभिलेख खात्याचे संचालक दीपक बांदेकर, संचालक निलेश फळदेसाई उपस्थित होते. मंत्री फळदेसाई म्हणाले, राज्यातील ऐतिहासिक दस्तऐवजाबरोबर जमीन नोंदीच्या दाखल्यांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे.

Goa: संस्कृती भवनात मोडी-मराठी दस्तऐवजांचे खास प्रदर्शन
Goa Tourism: दूधसागर पर्यटन हंगाम सुरु; गणेश गांवकरच्या हस्ते उद्‍घाटन!

ज्यामुळे बेकायदेशीरपणे बळकावणाऱ्या जुन्या जमिनीच्या कागदपत्रांचे फसवे संपादन रोखता येईल. पुराभिलेखागार खात्यांतील जमिनीची कागदपत्रे फसवणूक करून जमिनीवर मालकी हक्क सांगितला आहे.

खात्याकडे उपलब्ध दस्तऐवजांचे डिजिटलायझेशन केल्यास अशा घटनांना आणखी आळा बसेल आणि राज्याची जमीन तसेच सांस्कृतिक मूल्ये आणि इतिहास यांचे रक्षण होईल. ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

Goa: संस्कृती भवनात मोडी-मराठी दस्तऐवजांचे खास प्रदर्शन
Goa Bank: ज्‍येष्‍ठांचा मदतनिधी आता एकाच दिवशी बँकेत जमा होणार

तसेच, ज्याद्वारे लोक योग्य हेतूसाठी कागदपत्रे मिळवू शकतील असे ते म्हणाले.पुरालेखतज्ञ बालाजी शेणॉय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहाय्यक पुरालेखतज्ञ कृतिका सावंत यांनी आभार मानले.

16 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन

मोडी लिपी-मराठी दस्तऐवजांच्या प्रदर्शनात माधवराव पेशवे, इतर मराठे आणि महाराष्ट्र प्रांतातील संस्थानिकांनी पोर्तुगीज व्हाईसरॉय आणि इतर अधिकाऱ्यांना जमिनीचे वाद, शांतता राखणे, पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संबंध या विषयांवर पाठविलेल्या विविध पत्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुले राहणार आहे, असे फळदेसाई म्हणाले.

Goa: संस्कृती भवनात मोडी-मराठी दस्तऐवजांचे खास प्रदर्शन
Goa News: सुभाष वेलिंगकर म्‍हणजे एक योद्धा शिक्षक- दिलीप बेतकेकर

उपयुक्त माहिती

मोडी-मराठी दस्तऐवजांचे अनोखे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल पुराभिलेख खात्याच्या प्रयत्नांचे फळदेसाई यांनी कौतुक केले. या प्रदर्शनातून सामाजिक-राजकीय, सांस्कृतिक चित्रे समोर येणार आहेत. नव्या पिढीला या प्रदर्शनाचा खूप फायदा होईल, असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com