Goa : शिवोलीतील प्रसिद्ध सांजांव उत्सव साधेपणाने साजरा

sanjao.jpg
sanjao.jpg

शिवोली : दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असलेला शिवोलीतील (Siolim) सांजांव (Sao Joao Festival) उत्सव यंदा अत्यंत साधेपणाने स्थानिक सांजांव समितीकडून पारंपरिक वेशभुषा (Traditional costumes) प्रधान करीत सामुहिक प्रार्थनेने करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष  सिल्वेस्टर फर्नाडीस सचीव एलिसन फर्नाडीस तसेच काराशियल डिसौझा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(Goa Sao Joao festival celebrated in low key affair)

दरम्यान, येथील प्रसिद्ध सांजांव उत्सव दरवर्षी सरकारच्या कला व सांस्कृतिक खात्याच्या (Department of Arts and Culture goa) संयुक्त विद्यमाने स्थानिक सांजांव समितीकडून हर्षोउल्हासात साजरा करण्यात येत होता परंतु कोवीड (covid19) महामारीच्या पाश्वभुमीवर राज्यात गेल्या मार्चपासून लागुं करण्यात आलेली  टाळेबंदी (lockdown) व यंदा कर्फ्यू (curfew) जारी  करण्यात आलेला असल्याने सतत दोन वर्षे येथील सांजांव उत्सव घरगुती तसेच पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, मार्ना- शिवोलीतील सेंट एन्थॉनी चर्च (St Anthony Church) समोरच्या खुल्या जागेत गुरुवारी सकाळी सांजांव समितीकडून  कोवीड महामारीचा नायनाट करण्यासाठी  सेंट जॉन दि बाप्टीस्त या संतांच्या चरणापाशी गाऱ्हाणे घालण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com