Goa Accident News: 'वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती आवश्यक' - प्रबोध शिरवईकर

Goa Accident News: रस्ते अपघातातील बळींचा स्मृतिदिन
Goa Accident Cases| Goa News
Goa Accident Cases| Goa News Dainik Gomantak

Goa Accident News: रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांसंदर्भातील जनजागृती आवश्यक आहे. तसेच पोलिस, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक खाते, पंचायत, पालिका सारख्या सर्व संबंधित संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,असे मत दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान ‘गोवा कॅन’ या बिगर सरकारी संस्थेने रस्ते अपघातातील बळींचा जागतिक स्मृती दिन मडगावात पालिका परिसरात पाळला. जिथे 5 किंवा जास्त जीवघेणे अपघात झालेले असतात, त्या परिसराची अपघात प्रवण परिसर अशी नोंद होते.

नुवे येथील कार्मेल कॉलेज, टाटा शो रूम, राय येथील एदुआर्द फालेरो यांच्या निवासासमोरील वळण, केपे येथील पाटे (बाळ्ळी), मडगावात केटीसी बस स्थानक ते कोलवा सर्कल, बोर्डा येथील बोलशे सर्कल ते होली स्पिरीट हायस्कूल, वेर्णा अशा अनेक ठिकाणांची नोंद आहे.

पोलिसांकडून सामान्य नागरिकांसह विद्यार्थी, शिक्षकांना वाहतूक नियमांबद्दलचे मार्गदर्शन केले जाते.अपघातानंतर अपघातग्रस्ताला उपस्थितांनी प्रथमोपचार किंवा जवळच्या इस्पितळात हलविण्यात काहीही गैर नाही.

त्यासाठी आता नियम शिथिल केले असून मदत करणाऱ्यांची चौकशी होते, असा कठोर नियमही नाही, असे शिरवईकर यांनी स्पष्ट केले. चालकांना चालक परवाना देतानाही काही कठोर पावले उचलली पाहिजेत,असेही शिरवईकर यांनी सांगितले.

Goa Accident Cases| Goa News
Calangute Beach Fire: कळंगुट बीचवर अग्नितांडव; मायकल लोबोंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

ऑक्टोबरपर्यंत 217 जणांचा मृत्यू

या वर्षी जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंत रस्ते अपघातात गोव्यात 217 जण मृत्युमुखी पडले. त्यातील 126 जण हे दुचाकी स्वार, 22 मागे बसलेले, 9 चार चाकी वाहन चालक, 13 प्रवासी व 41 पादचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात ऑक्टोबर पर्यंत 2495 अपघात झाले. त्यांतील 202 गंभीर जखमी, 164 जणांना दुखापती झालेल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com