Goa Water Pollution News: सायपे तळे प्रदूषण रोखण्यासाठी धावाधाव!

Water Pollution News: प्रशासन सक्रिय : आझादनगरीला सिवरेज जोडणीसाठी प्राधान्य, अधिकाऱ्यांत विचारविनिमय
Water Pollution |Goa News
Water Pollution |Goa News Dainik Gomantak

Water Pollution News: नावेली येथील सायपे तळीच्या प्रदूषणाला आझाद नगरी झोपडपट्टी कारणीभूत असून तेथील सांडपाणी, कचरा या तळीत जात आहे. हा प्रदूषण प्रश्र्न न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे झोपडपट्टीला सिवरेज जोडणी देणे हाच प्रदूषण रोखण्याचा उपाय असल्याने जोडणी देण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये धावपळ सुरू झाली आहे.

सिवरेज साधनसुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते व मडगाव पालिका आदींच्या अधिकाऱ्यांमध्ये या झोपडपट्टीत सिवरेजजोडणी कशी द्यावी, यावर विचारविनिमय सुरू आहे.

नावेली येथील एक रहिवाशी प्रो. आंतोनियो आल्वारीस यांनी सालपे नदी प्रदूषणासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली त्यावरून आता एकेक प्रकार उघडकीस येत आहे.

तीन आठवड्यांत काम होणार

आठवड्यापूर्वी आमदार कामत यांनी सर्व सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या संबंधी चर्चा केल्याचे कळते. सध्या सिवरेज पाईपलाईन बसविण्याच्या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक ‘एसआयडीजीसीएल’ चे अधिकारी तयार करीत असून हे काम तीन आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Water Pollution |Goa News
Unknown Body Found in Anjune Dam : धक्कादायक; अंजुणे धरणात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला

शोध कसा लागला नाही?

गेली दोन दशके सांडपाणी तळीत जात असल्याचा शोध कसा काय लागला नाही?,असा सवाल केला जात आहे. ही झोपडपट्टी ही सर्वपरिचित आहे. मग ती कुकर्मे असू द्या किंवा विधानसभा, लोकसभा किंवा पालिका निवडणुका असू द्या. राजकीय नेते या आझादनगरीच्या आधारे आपली पोळी व्यवस्थित भाजून घेतात. या झोपडपट्टीत नेमकी किती घरे आहेत, याचा अंदाज येणे कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com