काळे कुटुंबाला 'निराधारांना आधार' योजनेअंतर्गत आर्थिक मदत

सत्तरी धनगर संघाचा नवीन उपक्रम, सरकारी योजनांचाही लाभ मिळवून देणार
काळे कुटुंबाला 'निराधारांना आधार' योजनेअंतर्गत आर्थिक मदत
नागवे सत्तरी (Sattari village) येथिल बिरो काळे कुटुंबाला आर्थिक मदत देताना संघाचे पदाधिकारीDainik Gomantak

पिसुर्ले: नागवे सत्तरी (Sattari village) येथिल बिरो धुळो काळे यांच्या अकाली निधनामुळे निराधार बनलेल्या त्यांच्या कुटुंबाला (Baseless Family) गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संघाचे संस्थापक उपाध्यक्ष स्वर्गीय विठू मुला वरक यांच्या स्मरणार्थ निराधारांना आधार या योजने अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत (Financial assistance) देण्यात आली. सदर कुटुंबातील कर्ता पुरुषाचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

नागवे सत्तरी (Sattari village) येथिल बिरो काळे कुटुंबाला आर्थिक मदत देताना संघाचे पदाधिकारी
गोव्यातील शेतकरी आता ‘ऑनलाईन’!

सदर घटनेची दखल घेऊन गोवा धनगर समाज सेवा संघाने काळे कुटुंबाला प्राथमिक स्तरावर आर्थिक मदत देण्यात आली आहे, बिरो धुळो काळे यांच्या मागे पत्नी तसेच पाच लहान मुले आहेत, यामध्ये तीन मुली, तर दोन मुलगे आहेत. त्यामधील सर्वात मोठी मुलगी इयत्ता सातवीच्या वर्गात शिकते तर लहान मुलगा इयत्ता पहिली शिकत आहे. त्याच प्रमाणे सर्वात लहान मुलगा काही प्रमाणात अपंग आहे. सदर कुटुंबाला संघातर्फे प्रयत्न करून सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे यावेळी संघाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष सगो यमकर, सचिव पवन वरक, उपकार्यध्यक्ष बबन येडगे, कार्यकरणी सदस्य जानू काळे, बिरो भैरू काळे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.