एससी,एसटी आयोगातर्फे समाज बांधवांसाठी कार्य: माजी चेअरमन प्रकाश वेळीप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

प्रकाश वेळीप म्हणाले, आयोगाच्या माध्यमातून वन कायदा, नोकर भरती, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम एसटी आणि एससी जमातीच्या युवकांसाठी राबविण्यात आले. समाजातील साधारण २० हजार लोकांपर्यंत आयोग पोहोचविण्याचे काम झाले आहे. या लोकांना आयोगाचे महत्त्व काय हे समजवून देण्यात आले आहे.

पणजी: महाविद्यालयात एससी, एसटी समाजातील लोकांना आयोगामुळे साहाय्यक प्राध्यापक अशी पदे मिळाली आहेत. त्याचबरोबर या समाजातील लोकांना पदव्युत्तर शिक्षणासाठी राखीव जागा ही देण्यात आल्या. ही सोय झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पदवीनंतरचे पुढील शिक्षण मिळणार आहे. पदोन्नतीचे रोस्टर अनेक खात्यात राखले जात नव्हते, परंतु त्यासाठीची प्रक्रिया कामाला लावली, अशी माहिती गोवा राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे माजी चेअरमन प्रकाश वेळीप यांनी दिली. प्रकाश वेळीप हे आयोगाच्या सुमारे १ हजार १३४ अधिक काळ या पदावर राहिले. 

ते पुढे म्हणाले, आयोगाच्या माध्यमातून वन कायदा, नोकर भरती, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम एसटी आणि एससी जमातीच्या युवकांसाठी राबविण्यात आले. समाजातील साधारण २० हजार लोकांपर्यंत आयोग पोहोचविण्याचे काम झाले आहे. या लोकांना आयोगाचे महत्त्व काय हे समजवून देण्यात आले आहे. आपल्या कार्यकाळात कारकिर्दीत १६१ तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी ६४ तक्रारींचा निपटारा झाला. आयोगाचे काम अधिकाधिक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या  लोकांपर्यंत नेण्याचे काम केले आहे. 

आपल्या कारकिर्दीत १६१ प्रकरणे दाखल झाली. दाखल प्रकरणांपैकी ६४ प्रकरणे निकाली निघाली. तर मागील व सध्याची अशी एकूण २१७ प्रकरणे प्रलंबित आहेत.राज्य सरकारने दिलेली जबाबदारी आपण सांभाळली. उटाच्या माध्यमातून चळवळीत काम केल्याने वंचित घटकाची कल्पना होती. या पदाचा मान सन्मान राखणे महत्त्वाचे आहे, न्यायालयाशी समकक्षी असलेल्या पदाची जबाबदारी सांभाळताना पुन्हा एकदा मागास घटकांची सुखदुखे जाणून घेता आली. 

वेळीप यांच्या कार्याविषयी समाजकल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी कौतुक केले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी चळवळीच्या माध्यमातून वेळीप जोडले गेले आहेत. एक शिक्षक, सहकार क्षेत्राचा अभ्यास असणारे आणि माजी आमदार राहिलेल्या वेळीप यांनी केलेले काम कौतुकास्पद राहिले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या