दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच 

dainik gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

काही उच्च माध्यमिक शाळांनी अकरासाठी प्रवेश घेण्यासाठी माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्टस) प्रसिद्ध केल्या आहेत तसेच विज्ञान, वाणिज्य व कला या शाखांसाठी प्रवेशासाठीची गुण टक्केवारी जाहीर केली आहे.

पणजी

राज्यात टाळेबंदीमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. अजूनही या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू असल्याने हा निकाल १५ जुलैनंतरच लागण्याची शक्यता गोवा शालान्‍त मंडळातील सूत्राने व्यक्त केली आहे. 
यावर्षी दहावीची परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार होती, ती टाळेबंदीमुळे दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. या दहावीच्या परीक्षेवेळी ‘कोविड - १९’च्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवर दडपण होते. त्यातच प्रत्येक प्रश्‍नपत्रिकांमध्ये काहीना ना काही त्रुटी आढळल्या होत्या. 
काही उच्च माध्यमिक शाळांनी अकरासाठी प्रवेश घेण्यासाठी माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्टस) प्रसिद्ध केल्या आहेत तसेच विज्ञान, वाणिज्य व कला या शाखांसाठी प्रवेशासाठीची गुण टक्केवारी जाहीर केली आहे. परीक्षेचा निकाल लागण्याआधीच ही प्रवेशाची टक्केवारी लावण्यात आल्याने काही पालकांनी या माहितीपुस्तिका खरेदी करून ठेवल्या आहेत. 

संबंधित बातम्या