नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २० सप्‍टेंबरनंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या अटींच्या अधीन राहून शाळेत येण्यास परवानगी दिली जाणार आहे.

पणजी: २० सप्टेंबरनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करता येतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने कळवले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले.

ज्यांच्या घरात कोविड लागण झालेली व्यक्ती नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, असे ठरले आहे. पालकांची संमतीही आवश्‍‍यक आहे. पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या अटींच्या अधीन राहून शाळेत येण्यास परवानगी दिली जाणार आहे. सॅनिटायझर्सचा वापर, समाज अंतर पाळणे, वैयक्तिक स्वच्छता, मुखावरण वापरणे आदींचे पालन करावे लागणार आहे. याआधी पालक शिक्षण संघटना आणि मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या संघटनांशी चर्चाही केली जाणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या