‘प्राथमिक शाळेतील मुलांच्या शिक्षणात खंड पडणार’

तालुक्यातील 65 पैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी आहेत. त्याचप्रमाणे त्या सर्वच शाळांमध्ये पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे.
Goa Schools
Goa Schools Dainik Gomantak

सुभाष महाले

काणकोण : तालुक्यातील 65 पैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी आहेत. त्याचप्रमाणे त्या सर्वच शाळांमध्ये पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे. गावडोंगरी, खोतीगावातील अंतर्गत भागातील शाळांचे विलिनीकरण केल्यास त्या ग्रामीण भागातील मुलांना पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची गैरसोय होणार आहे. वाहतूक व्यवस्थेअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे, असे पालकांचे मत आहे.

Goa Schools
Blog : किंचित उशिराने का होईना सरकारला शहाणपण सुचले!

खाजगी प्राथमिक शाळांचे लोण गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ, आगोंद या पंचायत क्षेत्रात पोचले आहे. त्यामुळे शासकीय प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. आता प्राथमिक शाळांचे विलिनीकरण झाल्यास खाजगी शाळा वाहतुकीची सोय उपलब्ध करून देत असल्याने पालक आपल्या मुलांना त्या खाजगी शाळेत पाठवणार असल्याने मुळांतच कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांची पटसंख्या घटणार आहे.

भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा मुक्तीनंतर वाड्यावर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडल्या. ग्रामीण भागातील जनतेला साक्षर करण्याचा तो धोरणात्मक निर्णय होता. मात्र नंतरच्या काळात त्या धोरणात्मक निर्णयाला तिलांजली देण्यात आली. कोकणी किंवा मराठी प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे, असे पालकांचे मत आहे.

अस्तित्वच धोक्यात!

पैंगीण तसेच गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील अंतर्गत भागातील प्राथमिक शाळांचे विलिनीकरण करताना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न विचारांत घेणे गरजेचे आहे. मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पालक, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे मत श्रद्धानंदचे व्यवस्थापक सुनील पैंगीणकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com