गोवा विभागातील सिनेमांचे गुपित कायम!

गोव्यात होणाऱ्या या सिनेमहोत्सवातील गोवा विभागातील सिनेमांची घोषणाच अद्याप करण्यात आलेली नाही.
गोवा विभागातील सिनेमांचे गुपित कायम!
Goa विभागातील सिनेमांचे गुपित कायम!Dainik Gomantak

पणजी: इफ्फीचे (IFFI) आज उद्‍घाटन होत आहे. यातील विविध विभागांची आणि त्यातील सिनेमांची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली. मात्र, गोव्यात (Goa) होणाऱ्या या सिनेमहोत्सवातील गोवा विभागातील सिनेमांची घोषणाच अद्याप करण्यात आलेली नसून, गोवा मनोरंजन सोसायटीने या विभागात नेमके कोणते सिनेमे निवडले आहेत याचे गुपित राखले असल्याचे बोलले जात आहे.

‘इफ्फी’ 15 दिवसांवर आलेली असतानाही गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने यातील गोवा विभागाबद्दल काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी दै. ‘गोमंन्तक’च्यावतीने हा विषय हाती घेऊन गोवा विभाग आयोजित करण्याबद्दल सकारात्मक पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर अखेर 6 नोव्हेंबर रोजी गोवा विभागाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यावेळी किमान चार सिनेमांची अट घालण्यात आली होती. त्यानंतर विविध माध्यमांतून ‘ईएसजी’च्या या अटीवर टीका होऊ लागल्यानंतर सदर किमान सिनेमांची अट मागे घेण्यात आली होती. आणि 15 नोव्हेंबरपर्यंत या विभागासाठीच्या सिनेमांची निवड करण्यात आली.

Goa विभागातील सिनेमांचे गुपित कायम!
यंदा इफ्फित व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांना महोत्सवासाठी आमंत्रित

शेवटच्या दिवसापर्यंत या विभागामध्ये एक पूर्ण लांबीचा सिनेमा आणि सात लघुपटांचे अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यातील कोणत्या सिनेमांची आणि लघुपटांची वर्णी गोवा विभागात लागणार याबद्दल 19 नोव्हेंबर अखेरपर्यंत घोषणा होणे अपेक्षित होते.

गोवा विभागाच्या सिनेमांची घोषणा लांबली...

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा विभागातील सिनेमांचे परिक्षकांनी परिक्षण केले असले तरी, सदर परिक्षक अद्याप गोव्यामध्ये आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी निवडलेल्या सिनेमांचा अंतिम निकाल अद्याप गोवा मनोरंजन सोसायटीकडे पोहोचलेला नाही. सदर परिक्षक 20 रोजी गोव्यात पोहोचण्याची शक्यता असून, आता 21 नोव्हेंबर रोजी गोवा विभागातील सिनेमांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिमासा भाषेतील सिनेमाने उद्घाटन

सेमखोर (दिमासा) या चित्रपटाने इंडियन पॅनोरमाचे उदघाटन होणार असून तो एमी बरुआ यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट दिमासाभाषेमध्ये (आसाममधील बोलीभाषा) बनवलेला पहिलाच चित्रपट आहे. वेद द व्हिजनरी (इंग्रजी) हा राजीव प्रकाश दिग्दर्शित चित्रपट भारतीय पॅनोरमा विभागाचा उदघाटनाचा नॉन-फिचर चित्रपट आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com