
Goa New Shack Policy: पर्यटन विभागाच्या नवीन शॅक धोरणात शॅक परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील निकष रद्द करण्यात आला.
पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी गोव्याच्या पारंपरिक शॅक मालकांना त्यांच्या मुलांना शॅक व्यवसायात आणण्याचे आवाहन केले जेणेकरुन शॅकचा व्यवसाय गोव्याबाहेरील लोकांच्या हातात जाऊ नये आणि तो गोवेकरांकडेच रहावा.
गुरुवारी, गोव्याच्या किनारपट्टी भागातील चार आमदारांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या समवेत बैठक घेतली जी नव्या शॅक धोरणानुसार शॅक परवाना लागू करण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील निकषांशी संबंधित होती.
शॅक धोरणाबाबत निर्णयाची वाट पाहत पर्यटन भवन पणजी येथे शंभरहून अधिक शॅक मालक उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मंत्री खंवटे यांनी सांगितले की, आमदारांशी चर्चेनंतर व शॅक मालकांच्या विनंतीचा विचार करून 60 वयोमर्यादेचा निकष नव्या धोरणातून वगळला आहे.
...तर 25 लाखांचा दंड !
गोव्यातील पारंपरिक शॅक मालकांनी आपल्या मुलांना शॅक व्यवसायात आणून शॅक यशस्वीपणे चालवावे, असे आवाहन खंवटे यांनी केले.
ते म्हणाले, या महिन्यात खाजगी शॅक पॉलिसी येणार आहे. शॅक मालकांनी जर बिगर गोमांतकीय व्यक्तींना शॅक चालवायला दिल्याचे आढळल्यास पर्यटन विभाग शॅक मालकांना काळ्या यादीत टाकेल आणि शॅक मालकाला २५ लाखांचा दंड ठोठावला जाईल.
शॅक निवडीची मुभा
गोव्यातील अनुभवी शॅक मालकांना ९० टक्के व १० टक्के शॅक्स नवीन येणाऱ्यांना देण्यात येतील,अशी घोषणा खंवटे यांनी केली. पर्यटन विभागाने शॅक वाटप केल्यानंतर शॅक मालक आधी वाटप केलेल्या शॅक एकामेकांत बदलत होते.
पण आता ठरवलेय की शॅक मालकांनी आपसात निर्णय घ्यायचा आणि त्यांना कोणती शॅक हवी, याची निवड करण्याची मुभा शॅक मालकांना दिली जाईल, असे खंवटे यांनी नमूद केले.
अन् शॅक मालक आनंदले
पर्यटनमंत्र्यांच्या केबिनबाहेर गुरुवारी अनेक गोव्यातील शॅक मालकांना तासाहून अधिक काळ तिष्ठत रहावे लागले. वेंझी व्हिएगस, जीत आरोलकर, आलेक्स सिक्वेरा,मायकल लोबो यांच्यासह चार आमदारांनी पर्यटन मंत्री खंवटेंशी चर्चा केली.
नंतर,मंत्री खंवटे यांनी शॅक धोरणामधून ६० वर्षे वयाचा निकष वगळल्याची घोषणा करताच शॅक मालकांनी आनंद व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.