Goa: खांडेपारतील 'मॉ आसरोघर' तर्फे म्हापसातील निराधाराला आश्रय

जीवन आनंद संस्थेचे गोवा व महाराष्ट्रत मिळून पाच ठिकाणी असे कार्य चालते (Goa)
Founder Sandeep Parab and Police Sub-Inspector Vibha Volvoikar with the homeless Person, Mapusa -  Goa
Founder Sandeep Parab and Police Sub-Inspector Vibha Volvoikar with the homeless Person, Mapusa - GoaDashrath Morajkar / Dainik Gomantak

पणदूर कुडाळ येथील जीवन आनंद संस्था ( Jeevan Anand Sanstha at Pandoor Kudal) संचालित ओपा खांडेपार( Opa khandepar, Goa) गोवा येथे स्थित असलेल्या 'माँ आसरोघर' (Maa Aasaroghar) तर्फे म्हापसा येथील रस्त्यावर फिरणाऱ्या निराधाराला आश्रय देण्यात आला. संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी आपल्या सहकाऱ्यासह म्हापसा येथे जाऊन त्यांची भेट घेतली व 'माँ आसरोघरात' आणले. या कामासाठी त्यांना म्हापसा पोलिसांचे सहकार्य लाभले. यावेळी म्हापसा पोलिस स्थानकाच्या पोलिस उपनिरीक्षक विभा वळवईकर या उपस्थित होत्या. गोव्यातील निराधार बांधवांसाठी खांडेपारतील 'माँ आसरोघर' आसरा देण्याचे कार्य करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या आश्रमातर्फे गोव्यातील अनेक निराधारासाठी आश्रय स्थान बनले आहे.

Founder Sandeep Parab and Police Sub-Inspector Vibha Volvoikar with the homeless Person, Mapusa -  Goa
Goa: सरकारने मांद्रे नदीचे काम हाती घ्यावे

यापैकी नुकताच म्हापसा येथे सापडलेला श्रीन रेड्डी असे त्याचे नाव असून तो मूळचा आंध्रप्रदेश येथील आहे. सदर गृहस्थ उजव्या पायाने अपंग असून मागील दहा महिन्यापासून या भागात भटकत होता. शेवटी संदीप परब यांच्यासाठी देवदूत पोहचून त्यांना सहारा बनला. दरम्यान संदीप परब यांनी म्हापसा येथे सदर व्यक्तीला भेटून त्यांचा विश्वास संपादन केला आणि आसरो घरात येण्याची विनंती केली. त्यानंतर श्री परब यांनी म्हापसा पोलिसांकडे यांला नेण्याची रीतसर परवानगी घेत त्याला आसरोघरात दाखल केले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते प्रसाद आंगणे उपस्थित होते.

Founder Sandeep Parab and Police Sub-Inspector Vibha Volvoikar with the homeless Person, Mapusa -  Goa
Goa: वेळगे शैक्षणिक संस्थेत भाऊसाहेबांची पुण्यतिथी साजरी

कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेचे गोवा व महाराष्ट्रत मिळून पाच ठिकाणी असे कार्य चालत आहे. त्यांचा पणदूर कुडाळ येथे संविता आश्रम चालतो तर मुंबईत खार (पश्चिम), सांताक्रूझ व वसई पालघर असे इतर तीन आश्रम आहे. यात मानसिक विकलांग व निराधार बांधवांसाठी आश्रम देण्याचे कार्य सुरू आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील आश्रम सुरू झाला असून या महिन्यात माशेल येथील एक निराधार महिला व बेतोडा फोंडा येथील ८० वर्षीय महिलेला पोलिसांच्या मदतीने संविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com